केस गळतीच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात मिक्स करून प्या 'हा' पदार्थ
सर्वच ऋतूंमध्ये केसांसंबधीत समस्या वाढू लागतात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेकदा केस मोठ्या प्रमाणावर गळू लागतात. यामुळे काहीवेळा केसांना टक्कल पडण्याची शक्यता असते. केस गळतीची समस्या वाढू लागल्यानंतर अनेक महिला दुर्लक्ष करतात. मात्र वारंवार होत असलेल्या केस गळतीकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा योग्य ते घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. अनेक महिला केसांच्या वाढीसाठी बाजारात उपलब्ध असलेले केमिकल प्रॉडक्ट वापरतात. यासोबत हेअरमास्क, शॅम्पू किंवा इतर कोणतेही प्रॉडक्ट लावले जातात. मात्र चुकीच्या प्रॉडक्टचा वापर केसांसाठी केल्यामुळे केसांचे गंभीर नुकसान होते.(फोटो सौजन्य – iStock)
केस गळती थांबवण्यासाठी महिला महागातले तेल, शॅम्पू आणि इतर उत्पादनांचा वापर करतात. वातावरणातील बदलांसोबतच आहारात पोषण तत्वांची कमतरता, अपुरी झोप, वाढलेला तणाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे केस गळती वाढण्याची शक्यता असते. केसांत कोंडा होणे, घाम साचणे, केस कोरडे इत्यादी अनेक गोष्टींमुळे केस मोठ्या प्रमाणावर गळू लागतात. त्यामुळे आज आम्ही आम्ही तुम्हाला केस गळती थांबवण्यासाठी कोमट पाण्यात पदार्थ मिक्स करून प्यावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांचे नियमित सेवन केल्यास केस गळणे थांबून त्वचेलासुद्धा अनेक फायदे होतील.
आलीय भट्ट आपल्या त्वचेचा आणि केसांची कशी घेते काळजी? काय आहे तिच्या सुंदरतेचा राज? बघुयात
केसांच्या वाढीसाठी आवळा अतिशय प्रभावी आहे. यामध्ये असलेले विटामिन सी केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रभावी ठरते. नियमित आवळा आणि कढीपत्त्याच्या रस एकत्र करून प्याल्यास केसांसोबतच संपूर्ण शरीराला सुद्धा फायदे होतील. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सि़डंट्स मोठ्या प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.






