हिमोग्लोबिन वाढवणारी फळं
आपल्या शरीरातील पेशींना ऑक्सिजन पोहोचवण्यात हिमोग्लोबिन महत्त्वाची भूमिका बजावते. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा आणि आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण दिवसभरात खाण्यासाठी अनेक फळांचा समावेश नाश्त्यात करून घेऊ शकतो अथवा भूकेच्या वेळीही खाऊ शकतो. कोणती आहेत ही फळं आपण जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
डाळिंब
हिमोग्लोबिनसाठी डाळिंब
डाळिंबाच्या दाण्यांमध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. लोह हे हिमोग्लोबिनचा मुख्य घटक आहे आणि व्हिटॅमिन सी लोह शोषण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून किमान २-३ वेळा नाश्त्यामध्ये डाळिंबाचे दाणे खाल्ले तरीही तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते.
सफरचंद
सफरचंदाने वाढेल हिमोग्लोबिन
सफरचंद हे असं फळ आहे जे रोज खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या फळामुळे अनेक आजार दूर होतात. सफरचंदातही लोह आढळते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सदेखील असतात ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो आणि आजारांचा संसर्ग होत नाही.
हेदेखील वाचा – हिमोग्लोबिन विषयी थोडक्यात माहिती जाणून घ्या
संत्री
संत्र्याचा करा समावेश
संत्रं हे फळ व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन सी लोह शोषण्यास मदत करते आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते. संत्री तशी तर १२ महिने उपलब्ध असतात. मुलांच्या डब्यातही तुम्ही सकाळचा नाश्ता म्हणून फळं देऊ शकता. संत्र्याचा समावेश नाश्त्यात अथवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी करून हिमोग्लोबिनची पातळी वाढू शकते.
द्राक्षे
हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी द्राक्षे
द्राक्षं हे खरं तर हंगामी फळ आहे. पण ज्या हंगामात द्राक्ष मिळतं तेव्हा नियमित खावे. द्राक्षांमध्ये लोहाबरोबरच तांबेही आढळते. हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्येही तांब्याची भूमिका महत्त्वाची असते, त्यामुळे आपल्या आहारात द्राक्षांचा समावेश करून घ्यावा.
हेदेखील वाचा – तुम्हालासुद्धा अशक्तपणा जाणवत असेल, तर या ड्रायफ्रुट्सचा वापर करुन बघा
किवी
किवीचा हिमोग्लोबिनसाठी वापर
किवी हे फळ तसं तर महाग असल्यामुळे सर्वांना परवडते असं नाही. पण किवी जेव्हा स्वस्त मिळते तेव्हा त्याचा नक्की फायदा करून घ्यावा. किवीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सही आढळतात. यामुळे नाश्त्यामध्ये किवीचा वापर करावा.
चेरी
चेरीने वाढेल हिमोग्लोबिन
चेरीचे लालचुटूक लहानसे फळ असले तरीही त्याचे गुण अत्यंत मोठे आणि उपयुक्त आहेत. चेरीमध्ये लोह आणि तांबे दोन्ही आढळतात. हे दोन्ही हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही चेरी बाजारातून घरी आणून नेहमी खावी.
बेर
बेरचा करा उपयोग
बेर या फळामध्ये लोहासोबतच व्हिटॅमिन सी देखील आढळते. हे दोन्ही हिमोग्लोबिनसाठी फायदेशीर आहेत. बेर खायला अनेकांना आवडत नाही मात्र त्याचे गुणधर्म अत्यंत फायदेशीर असून इतर फळांसह याचाही आपल्या नाश्त्यामध्ये समावेश करून घ्यावा.
या फळांचा आहारात समावेश करण्यासोबतच संतुलित आहार घेणेही खूप गरजेचे आहे.
हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.