Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! तरुणांमध्ये वाढतोय मणक्याच्या दुखापतींचा धोका; जीवनशैलीत योग्य बदल करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

सध्या तरूणांमध्ये मणक्याच्या समस्या वाढत जात असलेले दिसून येत आहे. यासाठी आपली जीवनशैली अधिक जबाबदार आहे. मात्र तज्ज्ञांनी आता तरूणांना इशारा दिला आहे. नक्की काय म्हणणं आहे जाणून घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 03, 2026 | 12:28 PM
मणक्याच्या समस्या का वाढतत आहेत (फोटो सौजन्य - iStock)

मणक्याच्या समस्या का वाढतत आहेत (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • मणक्यातील दुखापती का वाढत आहेत 
  • जीवनशैलीतील बदल ठरत आहे जीवघेणा
  • काय सांगतात तज्ज्ञ
मणक्याच्या (स्पायनल कॉर्ड) दुखापती या लहानांपासून थोरामोठ्या पर्यंत कोणत्याही वयोगटात आढळून येऊ शकतात. या दुखापतीमुळे पाठदुखी, हात किंवा पायांमध्ये कमजोरी, अंग सुन्न पडणे, हाता-पायांमधील अशक्तपणा (पक्षाघात) तसेच लघवी-शौचास नियंत्रण राखण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे दैनंदिन आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मणक्याच्या दुखापती कशा टाळता येतील याची माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. डॉ. तुषार राठोड, एम.एस. ऑर्थो, पीएच.डी, ऑर्थोपेडिक व स्पाईन सर्जन, मुंबई यांनी अधिक माहिती दिली आहे. 

आपल्या पाठीचा कणा हा आपल्याला सरळ उभं राहायला आणि योग्य शारीरीक हालचालींकरिता मदत करतो. या पाठीच्या कण्याच्या आत असलेली स्पायनल कॉर्ड मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमध्ये संदेश पोहोचविण्याचे काम करते. हात-पाय हलवणे, वेदना जाणवणे, श्वास घेणे तसेच लघवी-मलविसर्जन यांसारख्या क्रिया स्पायनल कॉर्डमुळे शक्य होतात. यातील काही क्रिया आपल्या नियंत्रणात असतात, तर काही आपोआप होतात. स्पायनल कॉर्डला इजा झाली तर त्याचा परिणाम काही वेळापुरता किंवा कायमस्वरूपीही देखील होऊ शकतो.

मणक्याच्या दुखापतीमुळे लाखो लोक त्रस्त आहेत. आजकाल पाठदुखी ही दीर्घकाळ कामावर गैरहजर राहण्याचे आणि अपंगत्वाचे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे. एकाच जागी जास्त वेळ बसून काम करणे, बसण्याची चुकीची पद्धत, व्यायामाचा अभाव तसेच सततचा प्रवास किंवा कामाच्या सवयी यामुळे अगदी तरुण वयातही मणक्यावर अतिरिक्त ताण येतो.याशिवाय सकाळचे कोवळे ऊन न मिळ्ल्याने व्हिटॅमिन डी ची कमतरता हे पाठदुखीचं एक महत्त्वाचं कारण ठरत आहे.

पाठीचा कणा ताठ ठेवण्यासाठी नियमित करा ‘ही’ आसन,पाठ दुखी होईल कमी

मणक्याच्या दुखापती कशामुळे होतात?

  • रस्त्यावरील अपघात
  • उंचावरून खाली पडणे
  • खेळताना झालेल्या दुखापती
  • हिंसाचारामुळे होणारी दुखापत
  • टीबी सारखे संसर्ग, गाठी (ट्यूमर)
  • वयामुळे होणारी पाठीच्या कण्याची झीज
या दुखापती सौम्य कमजोरीपासून ते पक्षाघाताइतपत या गंभीर असू शकतात.

मणक्याच्या दुखापतींचा धोका कसा कमी कराल?

वाहन चालवताना न विसरता सीट बेल्ट लावणे, मोबाईल  फोनचा वापर न करणे आणि दारू पिऊन वाहन न चालवणे या चांगल्या सवयींमुळे मणक्याच्या दुखापती टाळता येतात. त्याचबरोबर घसरुन पडण्यासारखे किरकोळ अपघात टाळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. घरात रेलिंग बसवणे, रात्रीच्या वेळी घरात योग्य प्रकाश पडेल अशी सुविधा असणे, धूम्रपान व मद्यपान टाळणे, वजन नियंत्रित राखणे, भरपूर पाणी पिणे आणि न घसरणारी पादत्राणे वापरणे गरजेचे आहे.

खेळाडूंनी विशेष काळजी घेत तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सुरक्षा साधने वापरणे आवश्यक आहे. पाठदुखी, हात-पाय सुन्न होणे किंवा अशक्तपणा जाणवल्यास  त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वमर्जीने औषधे घेणे धोकादायक ठरू शकते.

आतून खिळखिळी झाली हाडं, मिळतील 3 संकेत; सांगडा होण्यापूर्वी 4 कामं

मणका निरोगी ठेवण्यासाठी काय कराल?

मणक्याची काळजी घेण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराचे सेवन अतिशय गरजेचे आहे. अतिव्यायाम करणे टाळा कारण यामुळेही मणक्याची झीज होऊ शकते.चालणे, पोहणे, सायकल चालवणे, स्ट्रेचिंग आणि योगासनांमुळे मणक्याला आधार देणारे स्नायू मजबूत होतात.कामाच्या ठिकाणी आणि घरी बसताना योग्य शारीरीक स्थिती राखणे, वजन उचलताना पाठ सरळ ठेवणे आणि वजन नियंत्रित राखणे गरजेचे आहे. यामुळे मणक्यावर ताण कमी होतो.

Web Title: Shocking the risk of spinal injuries is increasing among young people experts advise making appropriate changes to lifestyle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • health issues
  • Health Tips

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
2

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
3

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
4

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.