Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात शरीर बनवा बळकट; घरी बनवा मूगडाळीची टेस्टी चिक्की, अनेक महिने साठवून ठेवता येईल

Moong Dal Chikki Recipe : मुगाच्या डाळीत प्रथिने, फायबर, लोह असे अनेक आवश्यक पोषक घटक आढळून येतात. तुम्ही आजवर याची भाजी किंवा भजी खाल्ले असतील मुगाच्या डाळीची चिक्की तुम्ही कधी खाल्ली आहे का? जाणून घ्या रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 16, 2025 | 03:35 PM
हिवाळ्यात शरीर बनवा बळकट; घरी बनवा मूगडाळीची टेस्टी चिक्की, अनेक महिने साठवून ठेवता येईल

हिवाळ्यात शरीर बनवा बळकट; घरी बनवा मूगडाळीची टेस्टी चिक्की, अनेक महिने साठवून ठेवता येईल

Follow Us
Follow Us:
  • हिवाळ्यात शरीराला पोषकतत्वांची आवश्यकता असते.
  • मुगाच्या डाळीची चिक्की बनवून अनेक दिवस साठवता येते.
  • ही चिक्की चवीला अप्रतिम लागते, शिवाय शरीरासाठीही ती पाैष्टिक ठरते.
हिवाळ्याचा ऋतू आला की शरीराला उष्णता, ऊर्जा आणि पोषण देणाऱ्या पदार्थांची गरज वाढते. अशाच पारंपरिक आणि पौष्टिक गोड पदार्थांपैकी एक म्हणजे मुग डाळ चिक्की. ही चिक्की केवळ चवीला अप्रतिम नसून आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक आहे. महाराष्ट्रात तसेच भारताच्या विविध भागांत चिक्की हा लोकप्रिय पदार्थ आहे. शेंगदाणे, तिळ यांपासून चिक्की आपण नेहमी खातो, पण मुग डाळीपासून बनवलेली चिक्की थोडी वेगळी आणि खास लागते.

Ragi Chapati Recipe : हाडे मजबूत करेल, पचनक्रियाही सुधारेल प्रोटीनयुक्त ‘नाचणीची चपाती’, रेसिपी नोट करा

मुग डाळ ही प्रथिने, फायबर, लोह आणि अनेक आवश्यक पोषक घटकांनी भरलेली असते. त्यामुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी ती फायदेशीर ठरते. गूळ आणि मुग डाळ यांचा संगम म्हणजेच ही चिक्की शरीराला त्वरित ऊर्जा देते आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. सणासुदीला, प्रवासात खाण्यासाठी किंवा रोजच्या आहारात गोड म्हणून ही चिक्की उत्तम पर्याय ठरते. घरच्या घरी अगदी मोजक्या साहित्यांत, कोणतेही रसायन न वापरता तयार होणारी मुग डाळ चिक्की स्वच्छ, पौष्टिक आणि चवीला अप्रतिम असते. चला तर मूग डाळीची आरोग्यदायी चिक्की तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करुन घेऊयात.

साहित्य:

  • १ कप धुतलेली मुग डाळ
  • १ कप गूळ (किसलेला)
  • २ टीस्पून तूप
  • १/२ टीस्पून वेलची पूड (ऑप्शनल)
  • तूप लावण्यासाठी थोडेसे तूप
५ मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारा ‘सालसा सॉस’, भारतीय जेवणाला येईल मेक्सिकन चव

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये मुग डाळ मंद आचेवर सतत हलवत खमंग भाजून घ्या. डाळ सोनेरी रंगाची झाली की गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.
  • भाजलेली डाळ मिक्सरमध्ये जाडसर कुटून घ्या. अगदी बारीक पावडर करू नका.
  • त्याच कढईत तूप गरम करून त्यात किसलेला गूळ घाला. मंद आचेवर गूळ पूर्ण वितळेपर्यंत ढवळत राहा.
  • गूळ वितळून एकजीव झाला की त्यात कुटलेली मुग डाळ आणि वेलची पूड घाला.
  • सर्व मिश्रण पटकन एकत्र करून गॅस बंद करा.
  • तुपाचा हलका हात लावलेल्या ताटात हे मिश्रण ओता आणि लाटण्याने सारखे पसरवा.
  • कोमट असतानाच सुरीने किंवा चाकूने हव्या त्या आकाराचे तुकडे कापा. पूर्ण थंड झाल्यावर चिक्की घट्ट होईल.
  • गूळ जास्त शिजवू नका, नाहीतर चिक्की फार कडक होऊ शकते.
  • हवी असल्यास यात काजू, बदाम किंवा तीळही घालू शकता.
  • ही चिक्की हवाबंद डब्यात १५–२० दिवस टिकते.

Web Title: A tasty healthy snack know how to make moong dal chikki at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • marathi recipe
  • moong dal
  • tasty food
  • Winter recipe

संबंधित बातम्या

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
1

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

Beetroot Chila Recipe : लालचुटूक बीटापासून घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चिला, पोषकतत्वांनी आहे भरपूर
2

Beetroot Chila Recipe : लालचुटूक बीटापासून घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चिला, पोषकतत्वांनी आहे भरपूर

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा
3

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा

Monsoon Special : पावसाळ्यात घरी बनवून खा खमंग आणि कुरकुरीत चवीचा ‘झिंगा फ्राय’
4

Monsoon Special : पावसाळ्यात घरी बनवून खा खमंग आणि कुरकुरीत चवीचा ‘झिंगा फ्राय’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.