थॅलेसेमिया आजार नक्की काय आहे
जॅकी श्रॉफ हे थॅलेसेमिक्स इंडियाचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित गंभीर आजार आहे. थॅलेसेमियाच्या रुग्णाची गर्भधारणा होण्यापूर्वी ती योग्य आहे की नाही याची तपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, लग्नापूर्वी लोकांनी थॅलेसेमिया मायनरची चाचणी करून घ्यावी. ABP हिंदी डिजीटलने याबाबत सांगितले आहे.
थॅलेसेमिया हा एक आजार आहे ज्यामध्ये शरीरातील हिमोग्लोबिनचे उत्पादन थांबते. हा रक्ताशी संबंधित आजार आहे, जो अनुवांशिक कारणांमुळे होतो. थॅलेसेमिया हा पालकांकडून मुलांमध्ये होतो अर्थातच हा आजार अनुवंशिक आहे. कमी माहितीमुळे अनेकांना याबाबत काहीच कल्पना नाहीये आणि हा आजार खूपच धोकादायक ठरू शकतो. चला जाणून घेऊया हा आजार कोणता आहे, त्याचा धोका कोणाला आहे आणि मुलांची किती काळजी घ्यावी (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
थॅलेसेमिया म्हणजे काय?
जिल्हा रुग्णालय जबलपूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ.नंदन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांमधील थॅलेसेमिया हा आजार अनुवांशिक असतो. जर पालकांना हा आजार असेल तर मुलाला थॅलेसेमिया होण्याची शक्यता 25% वाढते. लग्नाच्या वेळी स्त्री-पुरुषांची रक्त तपासणी केली तरच हे टाळता येऊ शकते. अशा परिस्थितीत मुलांना या आजारापासून वाचवता येते.
डॉ. शर्मा यांच्या मते, दरवर्षी 10 हजारांहून अधिक बालके थॅलेसेमियाच्या अत्यंत गंभीर प्रकाराने जन्माला येतात. या आजारामुळे त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशी निर्माण करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. यामुळेच थॅलेसेमियाग्रस्त व्यक्तीला वेळोवेळी रक्त चढवावे लागते.
किती धोकादायक आहे थॅलेसेमिया
थॅलेसेमियामुळे वारंवार रक्त चढवावे लागत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत वारंवार रक्त दिल्याने रुग्णाच्या शरीरात अतिरिक्त लोह घटक जमा होतात. त्यामुळे यकृत, हृदय आणि फुफ्फुसांना गंभीर नुकसान होऊ शकते. याशिवाय हिपॅटायटीस बी, हेपेटायटीस सी आणि एचआयव्ही होण्याचा धोकाही वाढतो. त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते
थॅलेसेमियाची लक्षणे
वय वाढण्यासह थॅलेसिमियाची लक्षणे दिसू लागतात, यापैकी सोपी आणि पटकन लक्षात येण्यासारखी नक्की कोणती लक्षणे आहेत जाणून घ्या
काय आहे थॅलेसेमियाचा उपाय
थॅलेसेमिया पूर्णपणे नष्ट होऊ शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. डॉक्टर या आजाराची तीव्रता, लक्षणे आणि रुग्णांना येणाऱ्या समस्यांवर आधारित उपचार करतात. रुग्णाच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी राखण्यासाठी, नियमित अंतराने रक्त देऊन शरीरातून अतिरिक्त लोह काढून टाकले जाते. याशिवाय डॉक्टर फॉलिक ॲसिडसारखे सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला देतात. आवश्यक असल्यास, थॅलेसेमियावर बोन मॅरो ट्रान्सप्लांटद्वारे उपचार केले जातात
थॅलॅसेमिया आणि लोहाच्या कमतरतेचा ऍनिमियातील फरक, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.