Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Liver Cancer : क्रिकेटर रिंकू सिंहच्या वडिलांचे स्टेज-४ कॅन्सरने निधन; समजून घ्या लिव्हर कॅन्सरचा धोका आणि त्याचे टप्पे…

भारतीय क्रिकेटपटू Rinku Singh यांच्या वडिलांचे स्टेज-४ यकृत कर्करोगामुळे निधन झाले. यकृताचा कर्करोग सुरुवातीला एका गाठीपासून सुरू होऊन टप्प्याटप्प्याने शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पसरतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 27, 2026 | 05:46 PM
रिंकू सिंहच्या वडिलांचे स्टेज-४ कॅन्सरने निधन

रिंकू सिंहच्या वडिलांचे स्टेज-४ कॅन्सरने निधन

Follow Us
Follow Us:
  • क्रिकेटर रिंकू सिंहच्या वडिलांचे स्टेज-४ कॅन्सरने निधन
  • यकृत कर्करोग का धोकादायक?
  • महिलांपेक्षा पुरुषांमध्ये प्रमाण जास्त
Liver Cancer Stages: भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू रिंकू सिंग यांचे वडील खानचंद सिंग यांचे शुक्रवारी 27 फेब्रुवारीला सकाळी ग्रेटर नोएडा येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झालं. ते स्टेज 4 यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त होते. वृत्तसंस्था PTIच्या वृत्तानुसार, अलिकडच्या काळात त्यांची प्रकृतीत बराच बिघाड झाला होता.  त्यानंतर त्यांना 21 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आणि 27 फेब्रुवारीच्या सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Horror Story : प्रवास अजून बाकी आहे! लाल डोळे रोखून पाहू लागला… अचानक आली जाग

यकृताचा कर्करोग हा एक प्राणघातक आजार मानला जातो, ज्यामध्ये यकृतामध्ये कर्करोगाचा ट्यूमर विकसित होतो. कर्करोगाचा टप्पा जसजसा वाढत जातो तसतसे कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागात देखील पसरू लागतात. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, एकदा कर्करोग वाढला आणि इतर भागात पसरला की त्यावर उपचार करणं आणि रुग्णाचे प्राण वाचवणे कठीण होतं. म्हणूनच सुरुवातीच्या टप्प्यातच हा आजार ओळखला जाणं गरजेचं आहे. तर त्याच्यावर उपचार करता येतात. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचवता येतो.

 स्टेज-४ म्हणजे काय? आणि यकृताचा कर्करोग हळूहळू कसा वाढतो? समजून घेऊया.

महिलांपेक्षा पुरुषांमध्ये प्रमाण जास्त

यकृताचा कर्करोग हा जागतिक आरोग्यावर एक महत्त्वाचा भार आहे. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फाउंडेशनच्या मते, 2022 मध्ये 8,66,600हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. हा जगभरातील 6 व्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे. महिलांपेक्षा पुरुषांना याचा त्रास होण्याची शक्यता असते. यकृताच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे (प्रति 100,000 मध्ये 12.7 रुग्ण) तर प्रति 100,000 महिलांमध्ये हे प्रमाण 4.8 इतके रुग्ण आहेत. 

कर्करोग कसा होतो?

यकृताचा कर्करोग तुमच्या यकृताच्या पेशींमध्ये सुरू होतो. कर्करोगाचे अनेक प्रकार होऊ शकतात. सर्वात सामान्य प्रकार म्हणजे हेपेटोसेल्युलर कार्सिनोमा, जो यकृताच्या मुख्य पेशींमध्ये सुरू होतो.  कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये देखील पसरू शकतो, जसे की  फुफ्फुसे किंवा स्तन सारख्या इतर भागांमध्ये तो पसरु शकतो. यकृताचा कर्करोग टप्प्याटप्प्याने वाढत जातो.  तो टप्पा जितका पुढे जाईल तितका धोका जास्त असतो. यकृताचा कर्करोग प्रामुख्याने चार टप्प्यात होतो.

यकृताचा कर्करोगाचे टप्पे

पहिला टप्पा: यामध्ये यकृतात एक ट्यूमर असतो जो कर्करोगग्रस्त असल्याचं निदान होते. या टप्प्यात, कर्करोग जवळच्या पेशी किंवा रक्तवाहिन्यांमध्ये पसरलेला नसतो.

दुसरा टप्पा: या टप्प्यात, यकृताच्या गाठीचा आकार वाढलेला असू शकतो. कर्करोग जवळच्या रक्तवाहिन्यांमध्ये त्याचा पसार होतो. यकृतामध्ये एकापेक्षा जास्त गाठी असू शकतात. परंतु या टप्प्यात, एकही गाठ साधारणपणे 5 सेंटीमीटरपेक्षा मोठी नसते.

तिसरा टप्पा: स्टेज ३मध्ये यकृताचा कर्करोग पूर्वीपेक्षा थोडा जास्त पसरलेला असतो.  5 सेमीपेक्षा मोठे एकापेक्षा जास्त ट्यूमर तयार होतात. किंवा ट्यूमर जवळच्या रक्तवाहिनीमध्ये त्याचा प्रसार झालेला असतो. अशा  परिस्थितीत कोणत्याही आकाराचे एक किंवा अधिक ट्यूमर जवळच्या अवयवांमध्ये पसरले आहेत. यकृताच्या गाठी जवळच्या लिम्फ नोड्सवर देखील परिणाम करू शकतात.

चौथा टप्पा: यकृताचा कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरलेला असतो. जसे की हाडे किंवा फुफ्फुसे यामध्ये त्याचा प्रसार होतो. तो जवळच्या लिम्फ नोड्स किंवा रक्तवाहिन्यांमध्ये देखील आढळू शकतो. यामुळे कर्करोग नियंत्रित करणे अधिक कठीण होते. स्टेज ४ कर्करोग घातक ठरतो.

यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढतो

यकृताच्या कर्करोगाचा धोका झपाट्याने वाढत आहे. मद्यपान हे यकृताच्या आजाराचे एक प्रमुख कारण मानले जाते. तथापि, वैद्यकीय अहवालांवरून असे दिसून येते की जे लोक मद्यपान करत नाहीत त्यांच्यामध्येही फॅटी लिव्हरसारखे आजार वाढत आहेत, ज्यांचे त्वरित उपचार न केल्यास ते लिव्हर सिरोसिस आणि कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. 

केस गळतीवर टोमॅटोचा रस रामबाण उपाय? टक्कल पडलेल्या ठिकाणीही येतील नवे केस; जाणून घ्या सत्य!

Web Title: Cricketer rinku singh father dies of stage 4 liver cancer know all liver cancer stages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • cancer
  • Cancer Awareness
  • daily health
  • Health News
  • liver cancer

संबंधित बातम्या

६५ वर्षीय महिलेच्या निर्विकार नजरेमागे दडला दुर्मिळ आजार; डॉक्टरांनी कर्करोगाच्या दुर्मिळ पुनरागमनाचे केले निदान
1

६५ वर्षीय महिलेच्या निर्विकार नजरेमागे दडला दुर्मिळ आजार; डॉक्टरांनी कर्करोगाच्या दुर्मिळ पुनरागमनाचे केले निदान

वेळीच ओळखा लिव्हर कॅन्सरची लक्षणे! लिव्हरच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
2

वेळीच ओळखा लिव्हर कॅन्सरची लक्षणे! लिव्हरच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Medha Manjrekar: मेधा मांजरेकरांना कर्करोगाचं निदान; आईसाठी लेक सईची भावनिक पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली…
3

Medha Manjrekar: मेधा मांजरेकरांना कर्करोगाचं निदान; आईसाठी लेक सईची भावनिक पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली…

महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकरांचा कॅन्सरशी लढा; उपचारानंतर व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, ‘काही प्रवास आयुष्य बदलून..’
4

महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकरांचा कॅन्सरशी लढा; उपचारानंतर व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, ‘काही प्रवास आयुष्य बदलून..’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.