अभिनेता शशांक केतकरचं घर पाहिलंत का
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘होणार सून मी या घरची’ प्रेक्षांकाच्या मनात घर करून राहिली. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं. या मालिकेतील मुख्य पात्र म्हणजे श्री, हे पात्र अभिनेता शशांक केतकरने निभावल. याच्या अभिनयाने तो महाराष्ट्राच्या घराघरात अगदी कमी वेळेत पोहचला आणि प्रेक्षकांच्या मनात त्याने आपली एक वेगळी जागा निर्माण केली. शशांक हा त्याच्या मालिका, चित्रपटांसोबतच पर्सनल आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो. नुकतेच शशांगने एक नवीन घर घेतल्याची बातमी आपल्या चाहत्यांना कळवली.
मराठी कलाकार शशांगने आपल्या हक्काचे नवीन घर जानेवरीमध्ये खरेदी केलं. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या नवीन घराचे काही फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले. यावेळी तो म्हणाला, मी नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर टाकले नाहीत. कारण मला सोशल मीडियावर सतत फोटो टाकायला आवडत नाही. काहीही घेतले की टाका फोटो, हे आवडत नाही. आपल्या कुटुंबातच या गोष्टी साजऱ्या कराव्यात असे मला वाटते” असे तो म्हणाला होता.
मात्र आता शशांगने आपल्या नवीन घराची एक छोटीशी झलक आपल्या आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकांऊटवरून शेअर केली आहे. यावेळी त्याने याला ”आनंदाच्या बागेत” असे कॅप्शन दिले आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यातील त्याचे सुंदर घर पाहून आता अनेकजण सुखावले आहेत. त्याच हे नवं घर प्रत्येकाला आपल्या स्वप्नातील वाटावं अगदी तसंच आहे.
शशांगच्या नवीन घराच्या भिंती अमेरिकन स्टाईल व ऑल व्हाईट रंगात सजवलेल्या आहेत. भिंतीवर आयताकृती असा बॉक्स तयार करण्यात आला असून मधोमध LED टिव्ही आहे. त्याच्या दोन्ही बाजुंना युनिक आणि सुंदर असा लॅंप बसवण्यात आला आहे. या लॅंपला दिव्यासारखी काच अन् आत मिणमिणता पिवळा बल्ब आणि त्या दिव्याला लटकत्या हिरव्यागार पानांच्या वेली लावलेल्या आहेत.
हेदेखील वाचा – घरी सोफा कसा स्वच्छ करायचा, जाणून घ्या सोपी पद्धत
घर म्हटलं की, खिडकीचे पडदे हे आलेच. शशांगच्या नवीन घरातील हॉलमध्ये एक मोठी ओपन खिडकी आहे. ज्याच्या दोन्ही बाजूंना सफेद रंगाचे पडदे असून या पडद्यांना विविध रंगाचे सुंदर, आकर्षक, नजर वेधून घेणारे गोंडे लावलेले आहेत. हे रंगीबेरंगी गोंडे पाहून मन अगदी प्रसन्न झाल्यासारखे वाटते.
शंशाकच्या शेअर केलेल्या व्हिडिओतील मुख्य आकर्षण ठरले आहे त्यांच्या घरात बसवण्यात आलेलं छोटंसं तुळशीवृंदावन. हल्ली मुंबईमध्ये वृंदावन सोडा तुळस दिसणंही मुश्किल होत चाललेलं असताना शशांकने मात्र घरात क्युटसं, छोटुसं मार्बलचं तुळशी बसवले आहे. हे तुळशीवृंदावन अनेकांच्या पसंतीस पडले आहे.