
हलव्याच्या दागिन्यांचा साजशृंगार! पारंपरिक दागिन्यांनी वाढवा सणांची गोडी
महाराष्ट्रात मकरसंक्रांती दिवशी सुगड पूजन केले जाते सोबतच तिळगुळ देत पतंग उडवली जाते, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नवदांपत्यांसाठी मकर संक्रांत हा सण खास असतो. या दिवशी नव्या जोडप्याचे कौतुक केले जाते. सासरी सुन आणि जावयाचे लाड होतात. मकरसंक्रांती दिवशी नव्या सुनेला हलव्याचे दागिने घालून, सजवून तयार करतात.(फोटो सौजन्य – pinterest)
Makar Sankranti 2026 : मकरसंक्रांतीला का खातात तीळगुळ? परंपरेत दडलेत अनेक आरोग्यदायी फायदे
घरात सुगड पूजन करून हळदीकुंकू साजरा केले जाते. महाराष्ट्रामध्ये मकरसंक्रांत हा सण तीन दिवस असतो. संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. काळ्या रंगाचे कपडे परिधान करून त्यावर हलव्याचे सुंदर सुंदर दागिने परिधान केले जातात. संक्रांतीच्या दिवशी हलव्याच्या दागिन्यांना विशेष महत्व आहे. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारातील हलव्याचे दागिने उपलब्ध आहेत. हलव्याचे दागिने नवीन वर्ष गोड आणि आनंदाने जावे, यासाठी हलव्याचे दागिने परिधान केले जातात.
पांढऱ्याशुभ्र टपोऱ्या तिळगुळापासून तयार केलेली नथ नाकात अगदी छान शोभून दिसते. काळ्या साडीवर उठून दिसणारा हा पांढरा हलवा या दिवसाची रंगत वाढवतो आणि आपल्या सौंदर्यात भरच पाडतो. आपण हातात बांगड्या घालण्याऐवजी हिरव्या चुड्यासोबत या हलव्याच्या बांगड्या देखील घालू शकतो. हातातल्या बांगड्यांप्रमाणेच पाटल्या आणि तोडे देखील अगदी सहज विकत मिळतात.
एरवी आपण दंडात वेगवेगळ्या प्रकारचे बाजूबंद घालतो. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपण हलव्यापासून तयार केलेला सुंदर आणि नाजूक बाजूबंद घालू शकतो. रंगीबेरंगी तिळगुळाचा वापर करून अगदी भरीव असा कंबरपट्टा काळ्या रंगाच्या साडीवर अधिक शोधून दिसतो.
गळ्यात आपण हलव्याची चिंचपेटी देखील घालू शकतो. यामुळे गळा अधिक भरीव आणि छान दिसतो. गळ्यातील इतर दागिन्यांप्रमाणेच हलव्याचे मंगळसूत्र देखील अतिशय आपण कानात देखील हलव्याचे दागिने घालू शकता.