(फोटो सौजन्य: Pinterest)
भारतातील एक असे हिल स्टेशन जिथे परदेशांना जाण्यास आहे मनाई, इथे जायचं असेल तर या गोष्टी ध्यानात ठेवा
तीळ ठरतो फायदेशीर
तीळ हा उष्ण, पचायला जड, पाककाली तिखट, स्पर्शाने थंड, कफपित्त वाढवणारे, बुद्धिप्रद, अग्निप्रदीप्तक, बल्क त्वचाप्रसादक आणि केशवर्धक असून लघवीचे प्रमाण कमी करणारा पदार्थ आहे. बाजारात पांढरे तीळ हे दोन प्रकारांत मिळतात, पॉलिश तीळ आणि साधे तीळ. आधुनिक शास्त्रानुसार तिळामध्ये मॅगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम आणि अत्याधिक ऑण्टिऑक्सिडंट घटकांचा समावेश आहे. पांढरे तीळ चावून खाल्ल्याने शरीराची ताकद वाढते. चावून खाल्ल्याने त्यातील स्निग्धतेमुळे हिरड्या मजबूत होतात. याच तिळाचे तेल अंगाला लावणे म्हणजे याला अभ्यंगस्नान म्हणतात. रोज तिळाच्या तेलाने अभ्यंग करावा. तो वार्धव्य (अकाली म्हातारपण), श्रम (थकवा), वात यांचा नाश करतो. दृष्टी स्वच्छ करतो. पुष्टी देतो. आयुष्य वाढवतो. निद्रा देतो. त्वचा सुकुमार करतो व शरीर मजबूत बनवतो.
तीळ हे दह्याच्या निवूळीबरोबर घेतल्यास लघवीची जळजळ कमी होते. तीळ, ओवा आणि गुळासह दह्याची निवळी घेतल्यास लघवीला वारंवार जाणे कमी होते. तिळाच्या काढ्यामध्ये गूळ एकत्र करून तो घेतल्यास मासिक पाळीच्या तक्रारी, जसे पोटात जास्त दुखणे, गाठी पडणे, अनियमित पाळी, कंबरदुखी या त्रासापासून आराम मिळतो. थंडीच्या काळ काळात सर्दी व त्यानंतर खोकला होतो. अशावेळी १ चमचा तीळ व २ कप पाणी उकळवून अर्धा कप शिल्लक उरवणे व तो गाळून पिणे, असे दिवसातून दोनवेळा घेतल्यास सर्दी आणि खोकला बरा होतो.
Constipation Test: 2 दिवसातून एकदा पोट साफ होणे योग्य? बद्धकोष्ठता आहे की नाही कसे समजून घ्याल
रुचकर आणि पथ्यकारक गूळ






