हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद झाल्यानंतर शरीरात दिसू लागतात 'ही' महाभयंकर लक्षणे
जगभरात हार्ट अटॅक, हार्ट ब्लॉकेज आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आहेत. चुकीची जीवनशैली, आहारात सातत्याने होणारे बदल, झोपेची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर होतो. यामुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. रोजच्या आहारात सतत तेलकट किंवा मसालेदार पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागतो. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहते. ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा हार्ट ब्लॉकेजसारखी अतिशय भयानक समस्या उद्भवण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेल्या कोलेस्टरॉलमुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. रक्तप्रवाह बिघडतो. तसेच हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही. हार्ट ब्लॉकेजची समस्या वाढू लागल्यानंतर शरीरात अनेक लक्षणे दिसू लागतात. मात्र या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. यामुळे मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे शरीरात दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा.
हार्ट ब्लॉकेज म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबीसदृश प्लॅक तयार होणे. वाढत्या कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये तयार झालेला थर रक्त प्रवाहामध्ये अनेक अडथळे निर्माण करतो. हा प्लॅक वाढल्यानंतर शरीरात सुरुवातीच्या दिवसांमध्ये अनेक सामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र कालांतराने प्लॅक वाढल्यानंतर अचानकपणे कधीही हृदयाची हालचाल थांबते. या स्थितीमध्ये हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता असते. याला ‘कोरोनरी आर्टरी डिसीज’ असे सुद्धा म्हंटले जाते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांवरून आणि चाचण्यांवरून ब्लॉकेज 10%, 30% किंवा 90% पर्यंत असू शकतो ओळखला जातो.
हार्ट ब्लॉकेज होण्यामागे अनेक कारण आहेत. त्यातील महत्वाचे कारण म्हणजे चुकीचा आहार, लठ्ठपणा, मद्यपान, व्यायामाचा अभाव, सततचा तणाव, आणि मधुमेह इत्यादी समस्यांपासून हार्ट ब्लॉकेज होऊ शकतात. याशिवाय महत्वाचे कारण म्हणजे शरीरात वाढलेला खराब कोलेस्ट्रॉल. शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हार्ट ब्लॉकेजची समस्या उद्भवते.
संसर्गजन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी मधात मिक्स करून खा ‘हा’ पदार्थ, कायमच शरीर राहील निरोगी
सतत थकवा, अशक्तपणा जाणवणे
श्वास घेताना त्रास होणे
हात, खांदा किंवा पाठीत वाढलेल्या वेदना
व्यायाम केल्यानंतर लगेच दमायला होणे
गॅस, अपचन, छातीत जळजळ होणे
रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे पायांमध्ये वेदना होणे