आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले 'हे' पौष्टिक लाडू केसांसाठी ठरतील प्रभावी
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला ताण, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीराला आवश्यक पोषक तत्वे न मिळाल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. यामुळे हाडांमध्ये वेदना वाढणे, अचानक चक्कर येणे किंवा सतत अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असते. यासोबतच केस गळण्यास सुरुवात होते. केस गळू लागल्यानंतर अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र तरीसुद्धा केसांचे गळणे थांबत नाही. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर हेअर केअर प्रॉडक्ट किंवा वेगवेगळ्या महागड्या ट्रीटमेंट करून केसांची काळजी घेतली जाते.(फोटो सौजन्य – pinterest)
धुतलेले केस ओले असताना चुकूनही करू नका ‘या’ चुका, अन्यथा केस होतील झाडू सारखे खराब आणि कोरडे
केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून केसांची काळजी घ्यावी. केसांमधील आवश्यक पोषण कमी झाल्यानंतर सतत केस गळू लागतात किंवा केसांची मूळ अतिशय कमकुवत होऊन जातात. त्यामुळे केसांना वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे जास्त आवश्यक आहे. केसांच्या वाढीसाठी महिला आयुयर्वेदिक तेलांचा वापर करतात. या तेलांचा वापर करून केसांची वाढ होते पण केसांवर नैसर्गिक चमक टिकून राहत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी आहारात कोणता बदल करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
केस गळती थांबवण्यासाठी काळे तीळ, आळशी, शेवग्याची पावडर आणि आवळ्याची पावडर अतिशय गुणकारी ठरेल. हे पदार्थ टाळूला योग्य पोषण देतात. आवळा केसांच्या वाढीसाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर घटक केसांच्या मुळांना पोषण देतात. यासोबतच अळशीच्या बियांचे सेवन केल्यामुळे केस गळती थांबते. यामध्ये ओमेगा-३ आणि लिग्रॅन्स मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे नियमित सकाळी उठल्यानंतर अळशीच्या बियांचे सेवन करावे. शेवग्याच्या शेंगामध्ये विटामिन ए, लोह आणि बायोटिन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे आहारात शेवग्याची पावडर किंवा शेंगांचे सेवन करावे.
लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, अळशीच्या बिया आणि काळे तीळ पॅनमध्ये भाजून घ्या. खमंग भाजून झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक पावडर तयार करून घ्या. तयार केलेली पावडर वाटीमध्ये काढून त्यात शेवग्याच्या शेंगांची पावडर आणि आवळ्याची पावडर टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात खजूर मिक्स करून लाडू बनवून घ्या. याशिवाय तुम्ही तयार केलेली पावडर सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यासोबतच नियमित खाऊ शकता.