
लिची (Lichi) फळ बाजारात उपलब्ध झाले आहे. यामध्ये कार्बोहाइड्रेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि बी कॉम्प्लेक्स आढळून येतात. तसेच पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नीशियम, फॉस्फोरस आणि आयरन सारखे मिनरल्स घटक असल्याने लिची मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते. चवीला आंबट गोड असलेल्या लिचीची आरोग्याला भरपूर फायदे होतात. लीचीचे सेवन केल्याने चेहर्यात चमक येऊन त्वचेवरील तारुण्य टिकून राहते. तसेच लिचीपासून ज्युस, आईस्क्रीम, सरबत, जेली, चॉकलेट इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. यामध्ये जीवनसत्व आणि खनिज आढळून येते. शारीरिक विकासाला प्रोत्साहित करण्याचे काम लिची करते.
भारतामध्ये १८ व्या शतकात लिचीची उत्पादन घेण्यास सुरुवात झाली. आकाराने लहान असलेल्या पण चवीला गोड असणारी लिची सगळ्यांचं आवडते. लिची हे हंगामी फळ असल्याने उच्च रक्तदाब, वजन कमी करणे, लठ्ठपणा यांसारख्या अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयोगी आहे. लिचीचा रंग लाल असून हे फळ चवीला गोड असते. चला तर जाणून घेऊया लिची खाल्ल्याने शरीराला नेमके काय फायदे होतात.
लिची खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे:
शरीराला ऊर्जा मिळते:
लिचीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. उन्हाळ्यामध्ये थोडस काम केल्यानंतर सुद्धा थकवा जाणवतो. अशावेळी तुम्ही लिचीचे सेवन केले तर शरीराला ऊर्जा मिळेल. यामध्ये असलेले नियासिन शरीराला ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात. तसेच हिमोग्लोबिन वाढून शरीर शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते.
[read_also content=”उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी आंब्यापासून बनवा मँगो चिया सीड्स पुडिंग https://www.navarashtra.com/lifestyle/make-homemade-mango-chia-seeds-pudding-for-summer-538662.html”]
वजन कमी करण्यास फायदेशीर:
वजन कमी करायचे असल्यास तुम्ही रोजच्या आहारात लिचीचा समावेश करू शकता. लिचीच्या गरामध्ये १२५ कॅलरीज असतात. तसेच यामध्ये फॅटचे प्रमाण कमी असल्याने वजन कमी होण्यास लिची फायदेशीर आहे. लिचीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असल्याने वाढते वजन कमी करण्यासाठी लिची उपयुक्त आहे.
त्वचेसाठी उपयुक्त:
लिचीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. त्वचेवरील काळे डाग, फोड, मुरूम किंवा पुरळ यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी लिची फायदेशीर आहे. वज वाढल्यानंतर अनेकदा त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. मात्र नियमित लिची खाल्ल्याने सुरकुत्या कमी होऊनचेहरा तरुण दिसतो. खाज सुटणे, त्वचा रोग, पुरळ येणं यांसारख्या समस्या असतील तर लिचीची सेवन करावे.
शरीर हायड्रेट राहते:
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते. पण काहीवेळेस शरीरातील पाण्याची कमतरता कमी होऊ लागते. अशावेळी तुम्ही लिचीचे सेवन करू शकता. उन्हाळ्यात लिचीचे सेवन करण्याचा सल्ला तज्ञ देतात.
[read_also content=”निर्जीव,कोरड्या केसांच्या समस्येपासून आराम मिळवायचा असेल तर ‘या’ पद्धतीने करा दह्याचा वापर https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-want-to-get-relief-from-the-problem-of-lifeless-dry-hair-use-curd-in-this-way-538619.html”]
पचनक्रिया सुधारते:
उन्हाळा वाढल्यानंतर पचन संदर्भातील अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी लिची खाल्ली पाहिजे. पोट हलके राहण्यास हे फळ उपयुक्त आहे. आहारात नियमित लिचीचे सेवन केल्याने शरीराला फायदे होतात. तसेच लिचीच्या सेवनाने ट्युमरच्या वाढीस प्रतिबंध करता येत.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.