किलोभर लसूण 2 मिनिटांत सोलून होईल फक्त 'या' भन्नाट टिप्स फॉलो करा, Video पहा आणि कमाल बघा
लसूण हा आपल्या स्वयंपाक घरातील एक महत्तवाचा पदार्थ आहे. जवळपास सर्वच भाज्यांत लसणाचा वापर केला जातो. पदार्थांची चव वाढवण्यात लसूण महत्तवाची भूमिका बजावत असते. लसूण जरी खाद्यपदार्थांची चव वाढवत असला तरी याला सोलणे अनेकांना कंटाळवाणे वाटतं असते. लसणाच्या साली जाड आणि चिकट असल्यामुळे हाताला चिकटतात आणि सोलताना वास येतो. इतकेच काय तर बऱ्याचदा लसणाच्या काही पाकळ्या इतक्या बारीक असतात की, त्यांना सोलताना अक्षरशः हैराण व्हायला होते.
नख तुटणे, खराब होणे, वास येणे या सर्व कारणांमुळे अनेकांना लसूण सोलणे नकोसे वाटत असते. तसेच हे काम अनेकजण टाळण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, काही घरगुती टिप्सच्या मदतीने तुम्ही अगदी सहज कोणतीही मेहनत न घेता अवघ्या दोन मिनिटांतच भरपूर लसूण सोलून ठेवू शकता. लसूण सोलण्याची ही ट्रिक तुमच्या फार कामी येणार आहे. चला तर मग याविषयीच सविस्तर जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – Raksha Bandhan Recipe: रक्षाबंधनाला भावासाठी घरच्या घरी बनवा नट्स चॉकलेट, कमी साहित्यापासून होते तयार
लसूण सोलण्यासाठी तुम्ही मिठाचा वापर करू शकता. यासाठी एक तवा घेऊन गॅसवर गरम होण्यासाठी ठेवा. तवा गरम झाला की त्यात लसूण टाकून 1 ते 2 मिनिटे भाजून घ्या. यानंतर यात एक चमचाभर मीठ टाका आणि पुन्हा लसूण 5 ते 6 मिनिटे भाजा. आता एका आता एका कॉटनच्या रूमालात लसूण काढून घ्या आणि रूमाल दुमडून लूसण चांगले चोळून घ्या. रूमाल उघडल्यानंतर जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला सर्व लसणाच्या साली वेगळ्या झालेल्या दिसतील.
लसूण सोलण्यासाठी तुम्ही काचेच्या डब्याचा वापर करू शकता. यासाठी एक मोठा काचेचा डबा घ्या आणि यात लसणाच्या पाकळ्या टाका. यांनतर डब्याचे झाकण घट्ट बंद करा आणि डबा जोरजोरात हलवा. या प्रक्रियेमुळे सालींवर घर्षण होऊन साली सहज सुटतात. अर्धा-एक मिनिट डबा हलवल्यानांतर डबा उघडा. तुम्हाला लसणाच्या साली वेगळ्या झालेल्या दिसतील. यामुळे काही मिनिटांतच तुम्ही सहज लसणाच्या साली वेगळ्या करू शकता.
लसूण सोलण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. यासाठी एक भांडे घ्या आणि यात पाणी टाका. मग यात लसणाच्या पाकळ्या टाका आणि या पाकळ्या 10-15 मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवा. पाकळ्या पाण्यात भिजवल्यानंतर त्यांना हाताने फोडा आणि पाहा की साली कशा सहज निघतात. या पद्धतीमुळे लसणाच्या पाकळ्या अगदी सहज वेगळ्या होतात आणि तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागत नाही.