रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी हा सण आहे. यावर्षी 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे. बहीण-भावाच्या नात्यातील स्नेह जपणारा हा दिवस खूप खास आणि पवित्र मानला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करता त्याच्या हाताला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला एक गोड भेटवस्तू गिफ्ट करतो.
अनेक महिलांची या दिवसासाठीची लगबग सुरु झाली आहे. राखी खरेदी करण्यापासून ते मेजवानीपर्यंत अनेक गोष्टी महिला आधीच ठरवून ठेवत असतात. रक्षाबंधनाला नेहमीच आपल्या भावाला काही गोड भरवण्याची परंपरा असते अशात यावेळी कोणतीही बाहेरची मिठाई न भरवता तुम्ही घरातच आपल्या भावासाठी खास नट्स चॉकलेट तयार करू शकता. हे चॉकलेट चवीला फार अप्रतीम लागते आणि अगदी कमी सामानापासून तयार होते. चाल तर मग यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – उपवासाच्या दिवशी काही गोड खावेसे वाटतं असल्यास झटापट बनवा रताळ्याचा शिरा