
The regal elegance of a Banarasi tissue silk saree(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
या साडीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे चमकदार आणि मऊ कापड यामुळे साडी नेसायला देखील आरामदायक ठरते . टिश्यू सिल्क तयार करताना रेशमी धाग्यांसोबत सोन्याचे किंवा चांदीच्या रंगाचे जरीचे धागे वापरले जाते त्यामुळे साडी अधिक उठावदार दिसते. त्यामुळे साडीला सुंदर झळाळी आणि धातूसारखी चमक प्राप्त होते. प्रकाश पडल्यावर या साडीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. ही साडी दिसायला भरजरी असली तरी अनेक प्रकारांमध्ये वजनाने हलकी असते.
Skincare tips: रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याची कशी काळजी घ्यावी? या टिप्स एकदा करा वापर
ही साडी सध्या तुम्हाला अनेक तरुणी तसेच सोशल मीडिया वर प्रसिद्ध होताना दिसत असेल कारणसाडीची बांधणी ही पारंपरिक सणांसाठी साजे अशी आहे. साडीमधील रंग हे आपल्याला चमकताना दिसतात त्यामुळे साडी अजूनच आकर्षक दिसते.तसेच या साडी मधील रंग हे भडक जाणवत नाहीत ते पेस्टल रांगांमध्ये असतात. त्यामुळे साडी दिसायला अद्वितीय दिसते.नववधूंपासून ते तरुणींंपर्यंत सर्वांमध्ये या साडीची लोकप्रियता वाढताना दिसते. या साडीला उठावदार लूक देण्यासाठी कॉन्ट्रास्ट ब्लाउज, गोल्डन ज्वेलरी आणि पारंपरिक हेअरस्टाइलची निवड करता येते. योग्य काळजी घेतल्यास ही साडी अनेक वर्षे सुंदर आणि टिकाऊ राहते.
बनारसी टिश्यू सिल्क साडीवर पारंपरिक भारतीय नक्षीकाम केलेले असते. यामध्ये फुलांची नक्षी, पानांचे वेलबुट्टी डिझाइन, मोर, कमळ, पारंपरिक बुट्टे आणि आकर्षक जरीकाम पाहायला मिळते. या साडीचा पदर विशेष आकर्षक असतो. पदरावर सुंदर नक्षीकाम आणि जरीची कलाकुसर केलेली असते. साडीच्या काठावरही बारीक आणि उठावदार डिझाइन्स असतात.या साड्या सोनेरी, चंदेरी, गुलाबी, लाल, हिरवा, राणी पिंक, पेस्टल आणि इतर विविध रंगांमध्ये उपलब्ध असतात. प्रत्येक रंग साडीला एक वेगळेच सौंदर्य प्रदान करतो.
भारतीय लग्नसमारंभ, साखरपुडा, दिवाळी, दसरा, धार्मिक कार्यक्रम आणि इतर शुभप्रसंगी बनारसी टिश्यू सिल्क साडी नेसण्यास विशेष पसंती दिली जाते. या साडीसोबत पारंपरिक दागिने, जसे की ठुशी, चंद्रहार, कोल्हापुरी साज, झुमके आणि बांगड्या परिधान केल्यास लूक अधिक खुलून दिसतो.बनारसी टिश्यू सिल्क साडी ही केवळ एक वस्त्रप्रकार नसून भारतीय पारंपरिक विणकामकला, कारागिरांचे कौशल्य आणि सांस्कृतिक वारसा यांचे सुंदर प्रतीक आहे. पारंपरिकता आणि आधुनिकतेचा सुरेख संगम असलेली ही साडी प्रत्येक स्त्रीच्या साडीच्या संग्रहात असावी अशी एक खास साडी आहे.
Ans: बनारसी टिश्यू सिल्क साडी तिच्या चमकदार पोतासाठी, मऊ कापडासाठी, आकर्षक जरीकामासाठी आणि नाजूक नक्षीकामासाठी ओळखली जाते. फुलांची नक्षी, वेलबुट्टी, पारंपरिक बुट्टे आणि सुंदर पदर यामुळे या साडीला शाही लूक मिळतो.
Ans: ही साडी लग्नसमारंभ, साखरपुडा, दिवाळी, दसरा, धार्मिक कार्यक्रम आणि इतर शुभप्रसंगी नेसता येते. पारंपरिक आणि आकर्षक लूक हवा असल्यास हा साडीचा उत्तम पर्याय ठरू शकतो.
Ans: सोनेरी, चंदेरी, लाल, गुलाबी, राणी पिंक, हिरवा आणि पेस्टल रंगांतील साड्या लोकप्रिय पर्याय आहेत. सौम्य आणि आधुनिक लूकसाठी पेस्टल रंग, तर पारंपरिक आणि उठावदार लूकसाठी लाल किंवा सोनेरी रंग निवडता येतो.