Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2024 : तुम्हालाही उटण्याची अ‍ॅलर्जी आहे? मग दिवाळीत ‘असा’ बनवा होममेड फेसपॅक

जर तुम्हालाही उटण्याची अ‍ॅलर्जी असेल तर तुम्ही दिवाळीत या होममेड फेसपॅकचा पर्याय निवडू शकता. कोणते फेसपॅक वापरावे आणि ते घरीच कशापद्धतीने तयार करावे याबाबत अधिक माहिती जाणून घ्या

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 29, 2024 | 05:30 PM
Diwali 2024 : तुम्हालाही उटण्याची अ‍ॅलर्जी आहे? मग दिवाळीत 'असा' बनवा होममेड फेसपॅक

Diwali 2024 : तुम्हालाही उटण्याची अ‍ॅलर्जी आहे? मग दिवाळीत 'असा' बनवा होममेड फेसपॅक

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळी म्हटलं की फराळ, रांगोळ्या, कंदील आठवतं त्याचप्रमाणे आठवतं ते अभ्यंगस्नान. दिवाळीतल्या पहिल्या अंघोळीच्या लहानपणीच्या आठवणींचा प्रत्येकाचा एक हळवा कोपरा आहे. सुंदधी तेल आणि त्यानंतर आईने लावलेलं उटणं या आठवणी आठवल्या की दिवाळीचा आनंद अजूनचं दुप्पट होतो.

सध्या बाजारात खास दिवाळीच्या पहिल्या अंघोळीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण मिळतात. तसंच उटणं देखील अगदी सहज मिळतं. दिवाळी आणि उटणं हे समीकरण अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. असं म्हणतात की, उटणं अंगाला लावल्याशिवाय दिवाळीची पहिली अंघोळ अपूर्ण आहे.

हेही वाचा- Diwali 2024: दिवाळीसाठी मराठमोळा लुक हवाय, मग ‘हे ‘ पारंपरिक दागिने नक्की परिधान करा…

असं जरी असलं तरी अनेकांना उटण्याची अ‍ॅलर्जी होते. खरंतर उटणं हे आयुर्वेदीक आणि पुर्वापार चालत आलेले फेसपॅक आहे. मात्र बऱ्याच जणांच्या त्वचेला त्याचा त्रास होतो. काही जणांची स्कीन अत्यंत संवेदनशील असते. त्यामुळे उटणं लावल्यावर त्वचेला खाज येणं, त्वचा लाल पडणं अशा समस्या निर्माण होतात.

उटण्यामध्ये वेगवेगळ्या औषधी वनस्पतींच्या खोडापासून तयार केलेलं असलं तरी काहींना याच्या नुसत्या वासाने शिंका येतात आणि डोळे लाल होतात. म्हणूनच बरेच जण दिवाळीत उटण न लावणंच पसंत करतात. जर तुम्हालाही अशीच उटण्याची अ‍ॅलर्जी होत असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी.

हेही वाचा- प्रेम आणि शुभतेचे प्रतीक, काय आहे दिवाळीतील रांगोळीचे महत्त्व

दिवाळीत उटणं लावण्याची इच्छा असूनही अनेकांना अ‍ॅलर्जी होत असल्यामुळे उटणं लावता येत नाही. अशा वेळी तुम्ही उटण्याला पर्याय म्हणून तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने फेसपॅक तयार करु शकता.

असा बनवा होममेड फेसपॅक

  • दिवाळीतील पहिल्या अंघोळीसाठी उटण्याला पर्याय म्हणून तुम्ही हा फेसपॅक वापरु शकता.
  • तांदळाचं पीठ, मसुरीच्या डाळीचं पीठ, आणि बेसन हे समप्रमाणात एकत्र करा.
  • त्यात एक छोटा चमचा आवळा पावडर, जेष्ठमध पावडर आणि आंबेहळद पावडरचं सारखं प्रमाण घेऊन एकत्र करा.
  • त्यानंतर त्यात भिमसेनी कापूरच्या तुकड्याची पावडर करुन एकत्र करा. हे चूर्ण तुम्ही मध आणि गुलाबजल एकत्र करुन चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर याने मसाज करु शकता.
यात असलेेल्या तांदळाच्या पीठामुळे नैसर्गिक स्क्रब तयार होतो. त्यामुळे त्वचेवरच्या मृत पेशी निघून जाण्यास मदत होते. त्वचा कोमल होण्यास मदत होते. सततच्या प्रदुषणामुळे आणि सूर्याच्या किरणांमुळे त्वचेवर टॅन येतो. त्यामुळे त्वचा चिडते त्वचेची आग होते अशा वेळी तुम्ही हा पेसपॅक चेहऱ्यावर लावू शकता. यात असलेल्या भिमसेनी कापरामूुळे त्वचेचा दाह कमी होतो आणि सनटॅन कमी होण्यास मदत होते.

त्वचेला नैसर्गिक थंडावा मिळाल्यामुळे त्वचेचं आरोग्य देखील चांगलं सुधारतं. त्यामुऴे दिवाळीत पहिल्या अंघोळीसाठी तुम्ही उटण्याऐवजी या होममेड फेसपॅकचा पर्यायचा निवडू शकता. या फेसपॅकमुळे कादी दिवसातच चेहऱ्यावर याचा चांगला परिणाम झाल्याचं दिसून येईल.

 

Web Title: Are you also allergic to sugandhi utane then make homemade face pack on diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 02:50 PM

Topics:  

  • Diwali

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.