फोटो सौजन्य - Social Media
ऋतू जसे बदलत जातात तसे आपले आरोग्य आणि त्यावर होणारे परिणामही बदलत जातात. हिवाळ्यात फाटणारे पाय आणि यावर उपाय काय? याचा शोध बरीच मंडळी घेत असतात. या बदलत्या वातावरणात आपले आरोग्य फार झुंज देत असते. अशा वेळी आपले आरोग्य राखणे फार महत्वाचे होऊन जाते. पाय फाटणे ही अतिशय सामान्य बनत जाणारी परिस्थिती आहे. बरीच माणसे या त्रासाने त्रस्त आहेत.
हिवाळयात हा त्रास फार वाढत जातो. वाढत्या या त्रासाला रोखणे फार गरजेचे असते. कारण हे फाटणारे पाय आणि त्यातून येणारे रक्त फार त्रासदायक असते. आणि हे फार चांगलेही दिसत नाही. तळव्याच्या त्वचेला क्रॅक्स येत असतात. विटामिनच्या कमतरतेमुळे अनेकदा तुमची टाच फाटू शकते. विटामिन सी, विटामिन B3, आणि विटामिन ई यांची कमतरता त्वचेला कोरडेपणा देते, आणि यामुळेच टाच फाटण्याची समस्या उद्भवते.
त्वचेला मॉश्चराइज करणे फार महत्वाचे आहे. त्यासाठी शरीरात पाण्याचे सेवन उत्तम असावे लागते. पाणी जास्त प्या, जितके पाण्याचे सेवन जास्त तितका शरीराला फायदा होत असतो. पण पाण्याचे कमी सेवन त्वचेच्या सुखेपणाला कारणी ठरतो आणि टाच फाटणे सारखी समस्या उद्भवते. त्यामुळे हिवाळाच्या दिवसात चांगल्या क्वालिटीचा मॉश्चराइजर लावणे फायद्याचे ठरते. कोणताही मॉश्चराइजर वापरण्याच्या अगोदर डॉक्टरांचा किंवा त्वचा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
अशा प्रकारे करा फाटलेल्या टाचेवर उपाय: