घरी बनवा आंबटगोड पेरु कँडी
चवीला आंबट गोड असलेले पेरू सगळ्यांचं खूप आवडतात. पेरू खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. हिवाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात पेरू उपलब्ध असतात. पेरूपासून ज्युस, सरबत किंवा इतर गोड पदार्थ बनवले जातात. बाजारातून घरी पेरू विकत आणल्यानंतर ते लगेच पिकतात. पिकलेले पेरू नरम झाल्यानंतर खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी पेरू फेकून दिले जातात किंवा मग पोपटाला खाण्यासाठी दिला जातो. पण पिकलेला पेरू फेकून देण्याऐवजी तुम्ही पेरूपासून आंबट गोड पेरु कँडी बनवू शकता. तुम्ही बनवलेली पेरू कँडी लहान मुलांसह मोठ्यांना खुप आवडते. चला तर जाणून घेऊया पेरू कँडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
पेरू खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पेरूमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा आणि केससंबंधित समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच लहान मुलांना सतत बाहेरून गोळ्या किंवा चॉकलेट आणून देण्यापेक्षा घरी बनवलेली होममेड कँडी खाण्यास द्यावी. पेरूपासून बनवलेले पदार्थ अधिककाळ चांगले टिकून राहतात. शिवाय तुम्ही पदार्थ बाहेर फिरायला गेल्यानंतर प्रवासामध्ये सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया पेरू कँडी बनवण्याची सोपी रेसिपी.
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा