कोविडच्या दोन वर्षांच्या लॉक डाऊन नंतर या वर्षी गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे, संपूर्ण देशात या उत्साहाची लाट पसरलेली दिसते. गणेशोत्सवाची सगळीकडेच लगबग सुरू असताना आपली गणेशमूर्ती कशी असावी याचे प्लॅनिंगही जोरदार असते. उत्तर प्रदेशातील चंदूसी इथे यंदाच्या गणेशोत्सवासाठी १८ फूट उंच सोन्याची गणेश मूर्ती साकारण्यात येत आहे.
यूपी मधल्या चंदूसी इथे हा १८ फूट उंच स्वर्ण गणेश साकारण्यात येत आहे. या गणरायाचे दागिने सोन्याचे करण्यात येत आहे. तिरूपती बालाजीच्या धरतीवर या गणपतीला साकारण्याच येत असल्याची माहिती या प्रोजेक्टशी संबंधीत अजय आर्य यांनी दिली आहे.
या मूर्तीच्या ४० ते ५० टक्के सोने वापरण्यात येणार असून बाकी इतर धातूंचा यात वापर करण्यात आला आहे. यावरच्या दागिन्यांमध्ये अगदी रेखीव काम करण्यात आले आहे. मुंबई-पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह जग जाहीर असला तर संपूर्ण देशात या उत्सवाला खूप प्रेमाने साजरा केला जातो.