
नवीन वर्षाची सुरुवात करताना लाडक्या प्रियजनांना आणि नातेवाईकांना पाठवा गोड शुभेच्छा
२०२५ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. लवकर २०२६ या वर्षाला सुरुवात होणार आहे. सरणाऱ्या वर्षाने सगळ्यांचं खूप जास्त आनंद, अनुभव आणि जीवनात नवीन नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा दिली. वर्षाच्या शेवटच्या दिवशी केवळ तारीख आणि वेळेत बदल न होता एक नवी उमेद, नवीन स्वप्ने आणि नवीन ध्येये, नवीन गोष्टी शिकण्याचे ध्येय आणि आनंद सगळ्यांमध्येच निर्माण झाला आहे. येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत आनंद आणि उत्साहात करण्यासाठी पार्टीचे आयोजन केले जाते. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात नात्यांमधील गोडवा आणखीनच फुलवण्यासाठी लाडक्या प्रियजन आणि नातेवाईकांना तुम्ही या मराठमोळ्या शुभेच्छा नक्कीच पाठवू शकता. या शुभेच्छा वाचून साऱ्यांचं खूप जास्त आनंद होईल. (फोटो सौजन्य – istock)
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! २०२६ हे वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, समृद्धी आणि भरभरून आनंद घेऊन येवो.”
“सरत्या वर्षाला निरोप देताना, नव्या वर्षात नव्या उमेदीने आणि नव्या स्वप्नांनी तुमच्या आयुष्यात आनंदोत्सव साजरा होऊ दे. हॅपी न्यू इयर २०२५!”.
“मैत्रीचे बंध असेच घट्ट राहू दे, प्रत्येक वळणावर तुझी साथ लाभो. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!”.
“गेलं ते वर्ष, गेला तो काळ, नवीन आशा, नवीन स्वप्नं, नवीन उमेद… नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!”.
“तुमच्या आयुष्यात प्रेम, आनंद, यश आणि आरोग्य नांदो, अशी सदिच्छा! नवीन वर्षाच्या शुभेच्छा!”.
“नूतन वर्षाभिनंदन! हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आरोग्यदायी आणि यशस्वी असो!”.
तुमच्या या मैत्रीची साथ यापुढेही अशीच कायम असू द्या.. नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपूया.. येणाऱ्या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!
पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया गतवर्षाची गोळाबेरीज करूया चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया नवे संकल्प, नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!
भिजलेली आसवे झेलून घे सुख-दुःख झोळीत साठवून घे आता उधळ हे सारे आकाशी नववर्षाचा आनंद भरभरून घे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हाला येणारे 12 महिने सुख मिळो, 52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
एक नवीन सौंदर्य,
एक नवीन स्वप्न,
एक विश्वास, एक आस्था
एक चांगला विचार.
हीच आहे चांगल्या नवीन वर्षाची सुरुवात.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
२०२६ हे येणारे नवेवर्ष
तुमच्या जीवनात सुख
आणि समाधान घेऊन येवो.
हे नवीन वर्ष आपणास
भरभराटीचे जावो.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
सरत्या वर्षाला निरोप देत,
नवी स्वप्न, नव्या आशा,
नव्या उमेदी आणि
नाविन्याची कास धरत
करू नवीन वर्षाचे स्वागत.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
नव्या वर्षाच्या सुरुवातीला
नवीन नाती जपूया,
नव्या धोरण्यांच्या चरणी
एकदा तरी आपले
मस्तक झुकवूया
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
२०२५ मध्ये माझ्या सुख-दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे बरं…
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा बरं…
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या
एवढंचं म्हणणं मांडतो बरं
आपणास व आपल्या परिवाराला २०२६ या येणाऱ्या नवीन वर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा !
प्रत्येक सकाळ आनंदाने सुरू होवो
नव्या दिवसाचा नवीन ऊर्जेने स्वागत करा
संपूर्ण वर्ष यशस्वी जावो
आयुष्याचा प्रत्येक क्षण खास ठरो
दुःखं सारी विसरून जाऊ ..
सुखं देवाच्या चरणी वाहू …
स्वप्नं उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेनं नव्यानं पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
New Year Party: कोकणच्या समुद्रकिनारी होणार नववर्षाचा जल्लोष
पुन्हा एक नवीन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितिजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!