Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2024: दिवाळीसाठी मराठमोळा लुक हवाय, मग ‘हे ‘ पारंपरिक दागिने नक्की परिधान करा…

सणावाराला छान दिसण्यासाठी दागिने सौंदर्यात भर घालतात. त्यामुळे स्त्रिया दागिन्यांना कायमच पसंती देतात. या दिवाळीत तुम्हाला मराठमोळा लुक करायचा असेल तर दागिने कोणते निवडावेत ते पाहूयात..

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 28, 2024 | 01:55 PM
Diwali 2024: दिवाळीसाठी मराठमोळा लुक हवाय, मग 'हे ' पारंपरिक दागिने नक्की परिधान करा...

Diwali 2024: दिवाळीसाठी मराठमोळा लुक हवाय, मग 'हे ' पारंपरिक दागिने नक्की परिधान करा...

Follow Us
Close
Follow Us:

अंधाराला दिव्यांनी उजळून टाकणारा सण म्हणजे ‘दिवाळी’. रंगोळी, पणत्या, फराळ आणि फटाके यांप्रमाणे दिवाळी ओळखली जाते ती लक्ष्मीपुजन, पाडवा आणि भाऊबीजेसाठी. दिवाळीच्या या शुभमुहुर्तावर अनेक जण नवीन वस्तू खरेदी करतात. पण तुम्हाला माहितेय का? दिवाळीत दागिने खरेदी करणं ही पुर्वापार चालत आलेली प्रथा आहे. या सणानिमित्त प्रत्येकजण आपआपल्या परीने सोनं किंवा चांदीचे दागिने खरेदी करतं. याच दिवाळीच्या निमित्ताने जाणून घेऊयात खास मराठमोळ्या पारंपरिक दागिन्यांबद्दल…

चैत्र नववर्षाप्रमाणेच दिवाळीत सोनं खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवाळीला जर तुमचा दागिने खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही महाराष्ट्रीय पद्धतीच्या पारंपरिक दागिन्यांचा विचार करु शकता.

चिंचपेटी

हा महाराष्ट्रीय पारंपरिक दागिन्यांच्या प्रकारातील लोकप्रिय असा दागिना आहे. असं म्हणतात की, चिंचपेटीचा शोध सोळाव्या शतकात लागला. या दागिन्यावर चिंचेच्या आकाराच्या छोट्या पेट्या तयार केल्या जातात. त्यात मोती किंवा हिऱ्य़ांनी त्याला आकर्षक सजावट केली जाते. चिंचपेटी ठुशीच्या जातकुळीतील असली तरी दोन्ही दागिन्यांमध्ये खूप फरक आहे. नऊवारी किंवा सहावारी काटपदराच्या साडीवर चिंचपेटी अतिशय खुलून दिसते.

कोल्हापुरी साज

महाराष्ट्रीय स्त्रियांचा सर्वांत आवडीचा दागिना म्हणजे कोल्हापुरी साज. या दागिन्याशिवाय मराठी दागिन्यांचं कलेक्शन अपूर्णच आहे. कोल्हापुरी साज या दागिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा लाखेवर तयार केलेला आहे. यात कमळ, मासा नाग, अशा विविध आकाराचं सुबक नक्षीकाम केलं जातं. पैठणी, काटपदराच्या साडीवर नाकात नथ आणि गळ्यात कोल्हापुरी साज यामुळे स्त्रियांचं सौंदर्य खुलून दिसतं.

नागोत्र

बाजूबंद हा प्रकार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर लोकप्रिय आहे. प्रत्येक राज्यातील ते ते वैशिष्ट्यं त्या दागिन्यांच्या कलाकुसरीत दिसून येतं. असाच प्रकार म्हणजे नागोत्र. हा दागिना स्त्रिया दंडावर परिधान करतात. नागाने घातलेल्या वेटोळ्या प्रमाणे याचा आाकर असतो म्हणून याला नगोत्र म्हणतात. काही भागांत याला नागबंद असंही म्हणतात. पेशवाई काळात हा दागिना अत्यंत लोकप्रिय होता. वाकी, वेळा आणि तोळेबंद हे बाजूबंदाचे वेगळे प्रकार आहेत.

गोठ

पाटल्या, तोडे यांप्रमाणे गोठ हा देखील मराठमोळ्या बांगड्यांचा प्रकार आहे. पेशवाई काळात सणावाराला किंवा लग्नकार्यात स्त्रिया हातात गोठ घालत असे. सोनेरी जाडसर कडं आणि त्यावर केलेलं कोरीव नक्षीकाम म्हणजे गोठ. सध्या सोशल मीडियामुळे गोठ ची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हिरव्या बांगड्यामध्ये सोनेरी रंगाचा गोठ यामुळे स्त्रियांचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं.

मेखला

कंबर पट्टा किंवा साखळी हे दागिने स्त्रियांमध्ये लोकप्रिय आहेत. नऊवारी साडी आणि त्यावर सोन्याचा किंवा चांदीचा कंबर पट्टा, साखळी किंवा छल्ला यामुळे स्त्रियांच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. मेखला त्यातलाच एक प्रकार आहे. नाजूकशी सोन्याची साखळी आणि त्यावर केलेलं नक्षीदार काम पाहून मेखला हा दागिना मनात घर करतो. मेखला पारंपरिक मराठी दागिना असून सध्या तो अपरिचित आहे.

तन्मणी


तुम्हाला जर मोत्यांच्या दागिन्यांची आवड असेल तर तन्मणी हा सुंदर पर्याय आहे. चिंतामणी किंवा काळपट रंगाच्या काटपदराच्या साडीवर परिधान केलेला तन्मणी शोभून दिसतो. पांढऱ्या रंगाच्या मोत्यांमध्ये तयार केलेल्या या तन्मणीचं पेंडन्ट हे वेगवेगळ्या रंगीबेरंगी खड्यांमध्ये असतं. आजच्या तरुण महिला वर्गामध्ये तन्मणी हा लोकप्रिय दागिना आहे.

 

 

Web Title: Beat maharashtrian jewellery collection for diwali festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 01:04 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.