
उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेच्या गरम लाटा जिव्हाची नुसती काहिली करत असतात. या सिजनमध्ये काही तरी थंड थंड खावेसे वाटतं असते. या दिवसांत अधिकतम लोकांची पसंती थंडगार सरबत पिण्याकडे असते. मात्र अनेक सॉफ्ट ड्रिंक्स आणि केमिकल पावडरने बनवले जाणारे सरबत आपल्या आरॊग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. म्हणूनच या दिवसात, घरातच सरबत बनवणे हा एक उत्तम पर्याय ठरेल. सरबत तर तुम्ही अनेकदा वेगेवेगळ्या गोष्टींचा ट्राय केला असेल पण तुम्ही कधी बेलाच्या फळाचा सरबत पिला आहे का? बेलाचे फळ मुख्यतः पूजेसाठी वापरले जाते मात्र याचे आपल्या शरीराला अनेक फायदे असतात.
बेलाच्या फळाचे फायदे:
कसे बनवायचे बेलाच्या फळाचे सरबत:
साहित्य:
बेलाच्या फळाचे सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम बेलाचे फळ सोलून घ्या आणि त्याचा लगदा वेगळा करून घ्या. यानंतर गॅसवर एक भांडे ठेवून त्यात पाणी उकळत ठेवा आणि मग त्यात बेलाचा फळाच्या लगदा आणि सर्व साहित्य टाकून सर्वकाही नीट मिसळून घ्या. आता याला चांगले उकळवा आणि सर्वकाही नीट मिसळत राहा. नंतर १०-१५ मिनिटांनी गॅस बंद करा आणि याला चांगले थंड होऊ द्या. हा सरबत थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा आणि मग थंडगार आणि आरोग्यदायी बेलाच्या फळाचा आस्वाद घ्या.