Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना राहणार पिंपल्स, ना राहतील डाग; उन्हाळ्यात झोपण्याच्या अगोदर चेहऱ्यावर लावा ‘हा’ तेल

पिंपल्स, डाग, कोरडेपणा आणि सनबर्न यापासून नैसर्गिक आराम मिळवा. उन्हाळ्यात झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर शुद्ध नारळ तेल लावण्याचे फायदे जाणून घ्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 02, 2025 | 05:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्याची त्वचा विशेषतः जास्त त्रासदायक ठरते. गरम वाऱ्यांमुळे, धूळ आणि घाम यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि चिकट बनते. अशा स्थितीत त्वचेला योग्य काळजीची आवश्यकता असते. या दिवसांत पिंपल्स, डाग-धब्बे, सुरकुत्या आणि टॅनिंगसारख्या समस्या वाढतात. बाजारात मिळणाऱ्या महागड्या आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सपेक्षा नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात. यामध्ये शुद्ध नारळ तेल एक उत्तम पर्याय आहे, जो अनेक त्वचा समस्यांवर सोपा आणि प्रभावी उपाय देतो.

आधुनिक प्रेमाचे कोडवर्ड्स; आजच्या तरुणांच्या डेटिंग शैलीतील बदल

नारळ तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-एजिंग गुणधर्म असतात. यामध्ये विटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि लॉरिक अ‍ॅसिडसारख्या घटकांचा समावेश असतो, जे त्वचेच्या पेशींना पोषण देतात आणि त्यांचे संरक्षण करतात. विटॅमिन ईमुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा अधिक तरुण दिसते. अँटी-बॅक्टेरियल घटकांमुळे पिंपल्सच्या समस्या कमी होतात. विशेषतः लॉरिक अ‍ॅसिड त्वचेवरील जंतूंना नष्ट करतं आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतं.

उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा आतून कोरडी होण्याची शक्यता असते. नारळ तेल त्वचेच्या आतपर्यंत पोहोचून नमी टिकवून ठेवतं आणि त्वचेला उजळ व मृदू बनवतं. याशिवाय, अधिक उन्हात फिरल्यानंतर चेहरा जळतो किंवा लालसर होतो, अशा वेळी नारळ तेल लावल्यानं त्वचेला थंडावा मिळतो आणि सूज कमी होते. त्यामुळे सनबर्नपासूनही नैसर्गिकरित्या संरक्षण मिळतं.

रिसर्चनुसार, हृदयाच्या आरोग्यासह रक्तातील साखर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते ‘सुके फळ’, नियमित खावे

नारळ तेल लावण्याची पद्धत खूप सोपी आहे. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा सौम्य फेसवॉशने स्वच्छ करून कोरडा पुसावा. त्यानंतर २–३ थेंब शुद्ध नारळ तेल हातावर घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने गोलाकार मालिश करावी. हे तेल रात्रीभर त्वचेवर ठेवावं आणि सकाळी साध्या पाण्याने चेहरा धुवावा. नियमितपणे ही पद्धत वापरल्यास त्वचा निरोगी, चमकदार आणि तरुण राहते. नैसर्गिक उपाय शोधत असाल, तर नारळ तेल हे एक प्रभावी आणि सुरक्षित पर्याय आहे, जे केवळ सौंदर्य टिकवून ठेवत नाही, तर त्वचेला आतूनही आरोग्य देतो.

Web Title: Benefits of coconut oil for summer skin care

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 05:15 AM

Topics:  

  • glowing face

संबंधित बातम्या

काळवंडलेल्या त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच बनवा ब्लीच
1

काळवंडलेल्या त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच बनवा ब्लीच

Skin Care Tips: डेड स्किनमुळे त्वचा काळी पडली आहे? कॉफीमध्ये मिक्स करा ‘या’ गोष्टी, त्वचा राहील कायमच सुंदर
2

Skin Care Tips: डेड स्किनमुळे त्वचा काळी पडली आहे? कॉफीमध्ये मिक्स करा ‘या’ गोष्टी, त्वचा राहील कायमच सुंदर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.