
रोजच्या आयुष्यात तणाव मुक्त जीवन जगण्यासाठी शरीराला सकस आणि संतुलित आहाराची आवश्यकता असते. संतुलित आहार घेतल्याने शरीराला योग्य ते पोषक घटक मिळतात. त्यामुळे रोजच्या आहारात फळे, भाज्या, कडधान्य, ड्रायफ्रूट्सचा समावेश करावा. फळांप्रमाणे ड्रायफ्रूट्स देखील शरीराला आवश्यक असतात. ड्रायफ्रूट्समुळे शरीरारला पोषक घटक मिळतात. त्यामुळे रोजच्या आहारात खजुराचा (Dates) समावेश करावा.
खजूर खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. खजूर खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. तसेच यामध्ये नैसर्गिक गोडवा आहे. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी खजूर खाल्यास त्यांना कोणताही धोका निर्माण होणार नाही. चला तर जाणून घेऊया खजूर सेवन केल्याने शरीराला नेमके काय फायदे होतात.
खजूर खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात:
हाडे मजबूत राहतात:
हाडांचे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोजच्या आहारात खजूराचे सेव्हन केले पाहिजे. खजूरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात जी हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे आहारात खजूराचे सेवन केल्याने हाडे निरोगी आणि मजबूत राहतात. शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे मिळतात. खजूरमध्ये तांबे, सेलेनियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असते.
सर्दी-खोकल्यापासून संरक्षण होते:
बदलत्या वातावरणामुळे काहींना लगेच सर्दी किंवा खोकला होतो. पण लक्षण दूर करण्यासाठी खजूर प्रभावी आहेत. खजूरमध्ये सर्व पोषक घटक असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊन सर्दी खोकला टाळता येतो.
[read_also content=”विटामिन पी ची कमतरता शरीरात आणेल गंभीर आजार, कशी कराल पूर्तता https://www.navarashtra.com/lifestyle/deficiency-of-vitamin-p-will-bring-serious-diseases-in-the-body-how-to-compensate-539896.html”]
वजन नियंत्रणात राहते:
रोजच्या आहारात खजुराचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते. खजूरमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतात. त्यामुळे खजूरच्या सेवनामुळे लवकर वजन वाढत नाही.वाढत्या कोलेस्टेरॉलचा टत्रास असलेल्या व्यक्तींनी आहारात रोज २ ते ३ खजूराचे सेव्हन करावे. खजुराचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन शरीर निरोगी राहते.
हृदय विकार:
हृदय विकाराचा धोका टाळण्यासाठी खजूर खाणे फायदेशीर आहे. खजूरमध्ये पोषक गुणधर्म असल्याने हृदय मजबूत आणि निरोगी राहते. रोजच्या आहारात ४ ते ५ खजूराचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी खजूर उपयुक्त आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.