आपल्या दैनंदिन आयुष्यात स्वयंपाकघरात अनेकदा आल्याचा वापर होत असतो. चहापासून ते भाजीपर्यंत अनेक गोष्टीत आला वापरला जातो. आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मे आढळली जातात. बऱ्याचदा खोकला-सर्दीसारखे आजार दूर करण्यासाठीही आल्याचा वापर केला जातो. आले झिंक आणि अँटी-ऑक्सिडंट्ससह अनेक पोषक घटकांनी समृद्ध आहे.
आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जाणाऱ्या मसाल्यांपैकी हे एक आहे. रोज सकाळी उपाशी पोटी आल्याचे सेवन केल्याने याचा शरीरावर काय परिणाम होईल हे तुम्हाला माहित आहे का? हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल्सच्या क्लिनिकल आहारतज्ज्ञ जी. सुषमा यांनी या विषयावर माहिती दिली आहे. चला सविस्तर जाणून घेऊयात.
[read_also content=”उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘अशा’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी https://www.navarashtra.com/lifestyle/how-to-take-care-of-health-after-high-blood-pressure-545938.html”]
आहारतज्ज्ञ जी. सुषमा यांनी सांगितले, भारतीय आयुर्वेदामध्ये अद्रक म्हणजेच आलं हा औषधांचा खनिजा म्हणून ओळखला जातो. निरोगी आयुष्यासाठी अनेकजण त्यांच्या आहारात आल्याचा समावेश करतात. आल्याचा वापर हा फक्त चहा किंवा काढा बनवण्यासाठी नाही तर अनेक गंभीर आजर दूर करण्यासाठीही केला जातो.
सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे सेवन केल्याने पचनास मदत होते, मळमळ कमी होते, रक्त परिसंचरण सुधारते आणि संपूर्ण प्रतिकारशक्ती वाढते. सकाळी आल्याचे सेवन केल्याने दिवसभर नैसर्गिक ऊर्जा मिळते.” चला तर मग आता आपण आले खाण्याचे काही फायदे जाणून घेऊयात.
आल्याचे फायदे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.