मेथी दाणे हेअर मास्क तयार करण्याची कृती
सुंदर आणि मजबूत केसांच्या वाढीसाठी महिला अनेक प्रयत्न करत असतात. सतत कोणत्या ना कोणत्या ब्रॅण्डचा शॅम्पू वापरणे, केमिकल ट्रीटमेंट करून घेणे, घरगुती उपाय करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण अनेकदा सतत केसांवर ट्रीटमेंट केल्यामुळे केस खराब होऊन जातात. त्यामुळे केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी केसांची योग्य ती काळजी घ्यावी. केसांची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून दोनदा शॅम्पू वापरून केस स्वच्छ करणे, केसांना तेल लावणे, कंडिशनर लावणे, हेअर मास्क लावणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. त्यामुळे केसांच्या मजबूत वाढीसाठी घरगुती उपाय करावे.नैसर्गिक पद्धतीचा वापर करून केसांची काळजी घेतल्यास केस मजबूत आणि लांबलचक होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया केसांना मेथी दाण्यांचा वापर कसा करावा.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: हिवाळ्यामध्ये नियमित करा ‘या’ ड्रायफ्रूटचे सेवन, आरोग्यासह रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास होईल मदत
केसांच्या चमकदार आणि मजबूत वाढीसाठी मेथी दाण्यांचा वापर केला जातो. मेथी दाण्यांमध्ये असलेले गुणधर्म केसांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. मेथी दाण्यांमध्ये आढळून येणारे घटक केसांना योग्य ते पोषण देण्यास मदत करतात. मेथी दाण्यांमध्ये असलेले फायटोस्ट्रोजन केस वाढवण्याची प्रक्रिया जलद करतात. ज्यामुळे केसांची वाढ भरभर होते. मेथी दाणे केसांच्या वाढीसोबतच केसांमधील कोंडा, टाळूवरील खाज आणि केस गळती थांबवण्यासाठी सुद्धा मदत करतात. त्यामुळे केमिकल ट्रीटमेंट करण्यापेक्षा घरगुती उपाय करून पाहावेत. ज्यामुळे केसांचे आरोग्य निरोगी राहील.
लांबलचक केसांच्या वाढीसाठी वाटीमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात मेथी दाणे भिजत ठेवा. २ तासांनंतर भिजवलेल्या मेथी दाण्यांची पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत सगळीकडे लावून घ्या. ३० मिनिटं ठेवून झाल्यानंतर केस शॅम्पूचा वापर करून स्वच्छ करा. यामुळे केस मऊ आणि मजबूत होण्यास मदत होते. हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून दोनदा लावू शकता. यामुळे केस गळती थांबेल.
केसांचे सौदंर्य टिकवून ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा केस धुवण्याआधी खोबऱ्याच्या तेलाने मसाज करावा. यामुळे केस मऊ आणि सिल्की होतात. तसेच केसांची चमक कायम टिकून राहते. मागील अनेक वर्षांपासून नारळाच्या तेलाचा वापर त्वचा आणि केसांच्या निरोगी आरोग्यासाठी केला जात आहे. या तेलाच्या वापरामुळे त्वचा आणि केसांसंबधित समस्या उद्भवत नाहीत.
हे देखील वाचा: डोळ्यांच्या खाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करून पहा, ८ दिवसांमध्ये काळेपणा होईल दूर
मेथी दाण्यांची पेस्ट केसांना लावण्यास टाळूवरील घाण स्वच्छ होण्यास मदत होईल. यामुळे केसांना येणारी खाज थांबेल. शिवाय केस गळणार नाहीत. केस गळतीची समस्या उद्भवू लागल्यानंतर नारळाच्या तेलात मेथी दाण्यांची पावडर मिक्स करून लावावी. ज्यामुळे केस गळणार नाहीत आणि केसांची वाढ झपाट्याने होईल.