झोपण्यापूर्वी चेहरा पाण्याने धुतल्यास त्वचेला होणारे फायदे
दिवसभर सतत काम करत राहिल्यामुळे त्वचेवर घाण, धूळ, माती इत्यादी पदार्थ जमा होऊन जातात. त्वचेवर साचून राहिलेल्या या हानिकारक घटकांमुळे त्वचा तेलकट होऊन जाते. तेलकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ केली नाहीतर त्वचेवर पिंपल्स वाढू लागतात. त्यामुळे उन्हातून किंवा इतर वेळी बाहेर जाऊन आल्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करावी. रोजच्या आयुष्यात कामाला जाताना किंवा इतर वेळी बाहेर फिरायला जाताना महिला, मुली त्वचेवर मेकअप करून बाहेर जातात. पण सतत मेकअप केल्यामुळे सुद्धा त्वचा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री बाहेरून जाऊन आल्यानंतर सगळ्यात आधी चेहऱ्यावर केलेला मेकअप काढून टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर त्वचा स्वच्छ करावी. आज आम्ही तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी चेहरा पाण्याने धुतल्यास त्वचेला काय फायदे होतात, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: केसांना तूप लावल्याने काय होते
उन्हातून किंवा इतर वेळी बाहेर जाऊन फिरवून आल्यानंतर सगळ्यात आधी त्वचा पाण्याने स्वच्छ करावी. पाण्याने त्वचा स्वच्छ केल्यास चेहऱ्यावरील सर्व घाण, माती निघून जाण्यास मदत होईल. तसेच त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकलेली घाण निघून जाईल. त्वचा धुतवताना त्वचेमधील छिद्र ओपन होतात. ज्यातून खराब तेल बाहेर पडून जाते. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा फोड येत नाहीत. तसेच रात्रीच्या वेळी त्वचा पाण्याने स्वच्छ धुतल्यास अशुद्धता निघून जाते आणि पिंपल्स कमी होतात.
त्वचेमधील तेल आणि ओलावा टिकवून ठेवण्यासाठी रात्री झोपण्याआधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. पाण्याने त्वचा धुतल्यामुळे त्वचेमध्ये नैसर्गिक ओलावा टिकून राहतो आणि चेहरा मऊ आणि चमकदार दिसतो. रात्री पाण्याने तोंड धुतल्यामुळे खराब झालेली त्वचा दुरुस्त होण्यास मदत होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी न चुकता पाण्याने तोंड स्वच्छ धुवावे.
झोपण्यापूर्वी चेहरा पाण्याने धुतल्यास त्वचेला होणारे फायदे
रात्रीच्या वेळी पाण्याने त्वचा स्वच्छ धुतल्यास चेहऱ्याचा रंग सुधारण्यास मदत होते.तसेच त्वचा स्वच्छ असेल तर रक्तभिसरण व्यवस्थित होते. उन्हात जाऊन काळवंडलेला चेहरा पुन्हा उजळ्वण्यासाठी रात्री झोपण्याआधी पाण्याने त्वचा स्वच्छ करावी. पाण्यामुळे त्वचेवर ताजेपणा येतो आणि त्वचा सुंदर आणि चमकदार दिसू लागते. रात्री झोपण्याआधी चेहरा स्वच्छ केल्यास रात्रभर त्वचा स्वच्छ होण्यास वेळ मिळतो. त्यामुळे रात्री झोपताना न चुकता त्वचेवर पाणी लावावे.
हे देखील वाचा: थंडीत तजेलदार त्वचेसाठी फॉलो करा या टिप्स
सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असेल तर कोरफडीच्या रसाचा वापर करावा. हा रस नियमित त्वचेवर लावल्यास त्वचा उजळदार आणि डाग विरहित दिसू लागेल. डार्क सर्कल, पिगमेंटेशन आणि टॅनिंगच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफडचा रस वापरावा. कोरफड त्वचेला आतून आणि बाहेरून पोषण देण्यास मदत करते.