पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय:
हल्ली कमी वयात अनेक महिला आणि मुलींचे केस पांढरे होऊ लागले आहेत. पांढऱ्या केसांमुळे कोणतीही हेअर स्टाईल केल्यानंतर पांढरे केस लगेच वर दिसून लागतात. यामुळे अनेकदा महिलांचा आत्मविश्वास कमी होतो. एवढेच नसून शाळेत जाणाऱ्या मुलामुलींचे सुद्धा केस पांढरे होऊ लागले आहेत. पांढऱ्या केसांच्या समस्येने अनेक लोक त्रस्त झाले आहेत. कमी वयात पांढरे केस दिसू लागल्यानंतर महिलांचे मानसिक आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. कमी वयात केस पांढरे होण्यामागे काही कारणसुद्धा आहेत. आहार, स्ट्रेस आणि तीव्र उन्हात जास्त वेळ फिरणे, सतत बाहेरचे पदार्थ खाणे इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यासह त्वचा आणि केसांवर लगेच दिसून येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: हार्ट अटॅक आल्यावर मोठ मोठ्याने खोकून आपला प्राण वाचू शकतो? जाणून घ्या सत्य
कमी वयात केस पांढरे होण्यामागे अनेक कारण आहेत. छोट्या मोठ्या गोष्टींचा मानसिक ताण किंवा स्ट्रेस घेतल्यामुळे केस पांढरे होऊ लागतात. केस पांढरे झाल्यानंतर अनेक महिला केसांना मेहंदी लावतात. पण चुकीच्या पद्धतीने मेहंदी लावल्यामुळे केसांची गुणवत्ता कमी होऊन केस खराब दिसू लागतात. त्यामुळे पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी केमिकल युक्त गोष्टी लावण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा वापर करावा.
पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी केमिकल ट्रीटमेंट कारण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थ केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हात किंवा इतर ठिकाणी बाहेर गेल्यानंतर केसांना सुती कापड बांधून जावे. असे केल्यामुळे केस ड्राय होत नाही.
हे देखील वाचा: कोंड्यापासून मुक्ती मिळ्वण्यासाठी खोबरेल तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, केस होतील मऊ
केसांच्या वाढीसाठी आवळा प्रभावी आहे. आवळ्यामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. यासाठी एक ग्लास पाण्यात आवळा सरबत किंवा आवळ्याची पावडर मिक्स करून प्यावी. हा उपाय नियमित केल्यास केसांना अनेक फायदे होतील. ज्या महिलांना कच्च आवळा खायला आवडत असेल तर तुम्ही रोज एका आवळ्याचे सेवन करू शकता.