केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेलात कापूर मिक्स करून लावण्याचे फायदे
मागील अनेक वर्षांपसून केसांच्या घनदाट वाढीसाठी खोबऱ्याचे तेल वापरले जात आहे. अजूनही बहुतेक महिला केसांच्या वाढीसाठी खोबऱ्याचे तेल लावतात. खोबऱ्याच्या तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे केस मऊ आणि सिल्की होण्यास मदत होते. पण हल्ली अनेक महिला खोबरेल तेलाचा वापर न करता इतर तेलांचा वापर करतात. केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरल्यामुळे केसांची मूळ नाजूक होऊन केसांची वाढ पूर्णपणे थांबते. केसांची वाढ थांबल्यानंतर नवीन केस लवकर येत नाही. अनेकदा बाजारात मिळणारे महागडे तेल लावून सुद्धा केस गळणे थांबत नाही. सतत केस गळत राहिल्यामुळे केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती असते. त्यामुळेच आहारात बदल करून केसांची योग्य ती काळजी घ्यावी.
वातावरणातील बदलांचा परिणाम केसांवर दिसून आल्यानंतर केस खराब होऊन जातात. पावसाचे पाणी केसांमध्ये पडल्यानंतर केस चिकट आणि तेलकट होतात. तेलकट झालेले केस स्वच्छ केले नाहीतर केस गळण्यास सुरुवात होते. केसांना केमिकल युक्त प्रॉडक्ट लावल्यामुळे केसांची मूळ नाजूक होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलात कोणता पदार्थ मिक्स करून लावावा, याबद्दल सांगणार आहोत. केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलात कपूर मिक्स करून लावावा. कापूर मिक्स करून लावल्यामुळे केसांची वाढ केसांची मूळ मजबूत होतात.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: सुरमा आणि काजळमध्ये काय फरक असतो? जाणून घ्या
सतत केस तेलकट आणि चिकट राहिल्यामुळे केसांमध्ये बॅक्टरीयाची वाढ होण्यास सुरुवात होते. केसांमध्ये बॅक्टरीया वाढल्यानंतर टाळूवर कोंडा होणे आणि फंगल इन्फेक्शन होणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेल कोमट करून घ्या. त्यानंतर त्यात कपूरचे खड्डे टाकून १ तास तेल तसेच ठेवा. अंघोळीला जाण्याच्या १ किंवा २ तास आधी केसांच्या मुळांना कपूर तेलाने मालिश करून मग शँम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यतून दोनदा केल्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होईल.
केसांच्या वाढीसाठी कापूरचे फायदे
खोबरेल तेलात कापूर मिक्स करून लावल्यामुळे केसांची मधील टक्कल कमी होऊन नवीन केस येण्यास मदत होते. नारळाच्या तेलात विटामिन E, लौरिक अॅसिड आणि फॅटी अॅसिड्स आढळून येते, ज्यामुळे केसांची वाढ होऊन केस सुंदर चमकदार दिसतात. कापूरमुळे केसांमधील रक्तभिसरण सुधारून केसांची वाढ होते. केसांच्या घनदाट वाढीसाठी नारळ तेलात कापूर मिक्स करून लावा.
हे देखील वाचा: चेहऱ्यावर हवा आहे Instant Glow! मग किचनमधील ‘या’ पदार्थांचा करा वापर, त्वचा दिसेल उजळदार
अतिप्रमाणात केमिकल शॅम्पू किंवा इतर प्रॉडक्ट वापरल्यामुळे टाळूवर जळजळ होण्यास सुरुवात होते. केसांच्या मुळांमधील प्रॉडक्ट लागल्याने केसांचे नुकसान सुद्धा होऊ शकते. या समस्यांपासून वाढवण्यासाठी खोबरेल तेलात कापूर मिक्स करून लावा. जेणेकरून केसांच्या टाळूवरील जळजळ थांबेल आणि केस स्वच्छ आणि सुंदर दिसतील.