पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी महिला अनेक वेगवेगळे उपाय करतात. पण अनेकदा चमकदार आणि स्वच्छ त्वचेवर पिंपल्स किंवा मुरूम आल्यानंतर त्वचेचे सौंदर्य खराब होऊन जाते. पिंपल्स किंवा मुरूम येण्यामागे अनेक कारण आहेत.शरीरातील हार्मोनल बदल, खाण्यापिण्याच्या सवयी, चुकीची जीवनशैली इत्यादी गोष्टींचा परिणाम दिसू लागल्यानंतर त्वचा खराब होऊन जाते. वातावरणात बदल झाल्यानंतर चेहऱ्यावर त्याचे परिणाम दिसून येतात. पावसाळ्यात वातावरणातील आद्रतेचा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागल्यानंतर त्वचा चिकट आणि तेलकट होऊन जाते. तेलकट झालेली त्वचा वेळीच स्वच्छ केली नाहीतर चेहऱ्यावर साचून राहिलेल्या धूळ, माती आणि तेलामुळे पिंपल्स येऊ लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील मुरूम आणि पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
निरोगी आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी फक्त क्रीम्स आणि महागड्या प्रॉडक्टचा वापर न करता योग्य त्या जीवनशैलीचा अवलंब करून जीवन जगले पाहिजे. अनेकांना रात्रीच्या वेळी उशीरा जेवण्याची आणि झोपण्याची सवय असते. उशिरा जेवल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते . त्यामुळे योग्य वेळात जेवून आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. मानसिक तणाव वाढल्यामुळे जीवन बदलून जाते. मानसिक तणावाचा परिणाम चेहऱ्यावर सुद्धा दिसून येतो. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधरण्यासाठी व्यायाम आणि प्राणायाम करणे आवश्क आहे.
हे देखील वाचा: जास्वंदीच्या फुलाचा वापर करून वाढवा चेहऱ्याचे सौंदर्य! काळे डाग घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा वापर
महिलांच्या शरीरात सातत्याने हार्मोनल बदल होत असतात. हे बदल काहीवेळ चेहऱ्यावर सुद्धा दिसतात. पिंपल्स येणे, मुरूम येणे, त्वचेसंबंधित समस्या निर्माण होणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर हळूहळू त्वचा खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता कमी झाल्यामुळे चेहरा खराब होतो. हार्मोन्स असंतुलित झाल्यानंतर टेस्टोस्टेरॉनसारखे एंड्रोजन मुरुम येण्यास कारणीभूत ठरतात.
पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
हे देखील वाचा: स्वयंपाक घरातील ‘या’ डाळीचा वापर करून चेहऱ्याची चमक वाढवा, फेसपॅकमुळे त्वचेवर दिसेल तारुण्य