मसूर डाळीचे त्वचेला असलेले फायदे
भारतीय जेवणात दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात डाळींचा समावेश केला जातो. यामध्ये तूरडाळ, चणाडाळ, मुगडाळ, मसूर डाळ, उडीद डाळ इत्यादी डाळींचा आहारात समावेश केला जातो. डाळीचे वेगवेगळे प्रकार असल्यामुळे डाळ मिरची टाकून किंवा तिखट टाकून सुद्धा बनवता येते. या सर्व डाळींमध्ये सगळ्यांच्या आवडीची डाळ म्हणजे मसूर डाळ. मसूर डाळ कुकरमध्ये लावल्यानंतर लगेच शिजते. तसेच चवीला सुद्धा ही डाळ चांगले असल्यामुळे अनेक लोक मसूरच्या डाळीचे सेवन करतात. जेवणाची चव वाढवण्यासोबतच मसूरची डाळ त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे. मसुरच्या डाळीचा वापर फेसपॅक किंवा फेसमास्क म्हणून सुद्धा केला जातो.
मसूरच्या डाळीमध्ये अनेक पोषक तत्वे आढळून येतात. मसूरच्या डाळीपासून तयार केलेला फेसपॅक लावल्यामुळे चेहऱ्याचा काळा पडलेला रंग उजळण्यास मदत होतो. उन्हात बाहेर गेल्यानंतर किंवा चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे त्वचा काळी आणि टॅन होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला टॅन झालेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी मसूर डाळीचा फेसपॅक कसा बनवायचा याची सोपी कृती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: दातांवर साचलेला पिवळा थर घालवण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ वापरा, दात होतील पांढरे
फेसपॅक बनवण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा मसूर डाळीचे पीठ घेऊन त्यात मुलतानी मिक्स करा. हे मिश्रण गुलाब पाण्यात किंवा दुधामध्ये तुम्ही भिजवू शकता. त्यानंतर संपूर्ण चेहऱ्याला फेसपॅक लावून चेहरा 15 मिनिटं कोरडा होण्यासाठी ठेवा. चेहरा कोरडा झाल्यानंतर पाणी घेऊन हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा फेसपॅक चेहऱ्याला लावल्यामुळे त्वचा एक्सफोलिएट होते.मुलतानी मातीमुळे त्वचा क्लिंझरप्रमाणे काम करते.
हे देखील वाचा: लांब केसांसाठी आवळ्यामध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, झपाट्याने होईल केसांची वाढ
कोरड्या त्वचेवर मसूर डाळीचा फेसपॅक लावल्यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो. तसेच दूध त्वचेसाठी फायदेशीर असल्यामुळे फेसपॅक बनवताना शक्यतो दुधाचा वापर करावा. फेसपॅक बनवण्यासाठी एका वाटीमध्ये मसूर डाळीचे पीठ घेऊन त्यात दूध टाका. पिठामध्ये जास्त दूध टाकू नये. त्यानंतर तयार केलेला फेसपॅक चेहरा लावून झाल्यानंतर 15 मिनिटं तसाच ठेवा. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.