
रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी टिप्स
बिग बॉस मराठी च्या ५ व्या सिझनला सुरुवात झाली आहे. सीझनच्या पहिल्याच्या दिवशी घरात वाद निर्माण झाले. त्यानंतर टास्क खेळताना जान्हवी किल्लेकरने प्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांच्या कारकिर्दीला ओव्हर अकटिंग म्हणत त्यांचा अपमान केला होता. पॅडी कांबळे यांचा अपमान केल्यानंतर जान्हवीला अनेकांनी खडेबोल सुनावत रितेश देशमुखने तिला बिग बॉस मराठीच्या जेलमध्ये टाकले. रागामध्ये असल्यानंतर आपण काहीही बोलून समोरच्या व्यक्तीचा अपमान करून निघून जातो. पण रागात बोलले शब्द कायम तसेच राहतात. रागामध्ये असताना आपण समोरच्या व्यक्तीच्या भावना कळत नकळत दुखावतो, त्यामुळे रागात असताना स्वतःच्या शब्दांवर संयम असणे फार गरजेचे आहे.याच रागावर नियंत्रणात मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही महत्वपूर्ण टिप्स सांगणार आहोत. ज्या फॉलो केल्यामुळे नक्कीच तुमच्या रागावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकाल.
एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा किंवा तिच्या चुकीच्या बोलण्याचा तुम्हाला भयंकर राग आला असेल तर काउंट डाउन करण्यास सुरुवात करा. यामुळे तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळवू शकता. न थांबता १०० ते १ पर्यंत उलटे अंक मोजून रागावर नियंत्रण मिळवा. यामुळे तुमच्या विचलित झालेले लक्ष शांत होऊन रागावर नियंत्रण मिळेल.
हे देखील वाचा: मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, रक्तातील साखर राहील नियंत्रणात
राग आल्यानंतर अनेकदा चुकीचे शब्द बाहेर येतात. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावू शकतात. रागाने आल्यानंतर डोक्यात असलेले सर्व चांगले विचार नष्ट होऊन सतत वाईट विचार मनात येतात. त्यामुळे राग आल्यानंतर शांत बसून राहा. जिथे तुमच्या बोलण्याची काहीच गरज नाही तिथे एकही शब्द बोलू नका. यामुळे नाती तुटू शकतात.
अनेकदा एखाद्या व्यक्तीचा राग आल्यानंतर सतत चीड होते. यामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन बिघडून जाते. त्यामुळे खराब झालेले मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा. व्यायाम केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. मूड सुधारण्यासाठी आणि तणाव मुक्त होण्यासाठी व्यायाम करावा.
हे देखील वाचा: रोज सकाळी न चुकता करा हे काम, पोटावरील चरबी विरघळेल
राग आल्यानंतर तुमच्या आवडीचे एखादे गाणे किंवा तुमच्या आवडीचा कोणताही चित्रपट बघा. तसेच राग आल्यानंतर शांत आणि मनाला रझा देणारे संगीत ऐकावे. यामुळे तुमचा मूड सुधारून मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते.