Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वांसाठी जगताना स्वतःला विसरू नका; हे 5 प्रसंग जिथे ‘सेल्फिश’ होणंच योग्य ठरतं

‘सेल्फिश’ हा शब्द अनेकदा नकारात्मक अर्थाने घेतला जातो. पण सत्य असं आहे की प्रत्येक वेळी इतरांचा विचार करत राहिल्यास स्वतःचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं. काही प्रसंगी स्वतःला प्राधान्य देणं गरजेचं ठरतं.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 28, 2026 | 01:43 PM
सर्वांसाठी जगताना स्वतःला विसरू नका; हे 5 प्रसंग जिथे ‘सेल्फिश’ होणंच योग्य ठरतं

सर्वांसाठी जगताना स्वतःला विसरू नका; हे 5 प्रसंग जिथे ‘सेल्फिश’ होणंच योग्य ठरतं

Follow Us
Close
Follow Us:
  • व्यायाम, विश्रांती आणि स्वतःची काळजी पुढे ढकलू नका. स्वतःसाठी वेळ काढणं हा स्वार्थ नसून गरज आहे.
  • नकारात्मक लोकांपासून दूर राहणं आणि स्वतःसोबत वेळ घालवणं तुमच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
  • जिथे तुमच्या भावना सतत दुर्लक्षित केल्या जातात, अशा नात्यांपासून अंतर ठेवणं हे आत्मसंरक्षण आहे, स्वार्थ नाही.
‘स्वार्थी’ किंवा ‘सेल्फिश’ हा शब्द ऐकला की अनेकांना वाटतं की गुण वाईट असतो, पण वास्तव असं आहे की आयुष्यात काही प्रसंग असे येतात जिथे इतरांपेक्षा स्वतःचा विचार करण खूप महत्वाच ठरतं. जर नेहमीच इतरांच्या मतांचा किंवा भावनांचा विचार करत राहिलात, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे आयुष्यात संतुलन ठेवण्यासाठी काही प्रसंगात थोडे ‘स्वतःसाठी; होण आवश्यक आहे. हे समजणे खूप महत्वाचे असते. कोणत्याही परीस्थित स्वतःला कसे प्राधान्य द्यावे हे जाणून घेऊया.

तुम्हालाही Breast cancer तर नाही? कपडे घालताना ही गोष्ट नक्की तपासा, वेळीच टाळता येईल गंभीर समस्या

आरोग्य आणि फिटनेसबाबत निर्णय

फिटनेसच्या बाबतीत आपण उद्यावर ढकलत राहतो किंवा एखाद्या मित्रांसोबत सुरू करू असा विचार करतो. पण असं करताना वेळ निघून जातो आणि आरोग्य मागे राहतं. म्हणून स्वतःला नेहमी पाहिलं प्राधान्य ह्या किमान रोज काही वेळ व्यायामासाठी राखून ठेवा.

मानसिक शांतात धोक्यात येत असेल

जीवनात लोक काही असे असतात जे सतत नकारात्मक पसरवत राहतात. अशा व्यक्तींना दूर ठेवणे ही स्वार्थाची गोष्ट नसून तुमच्या मानसिक आरोग्यसाठी केलेलं योग्य पाऊल आहे. स्वतःला शांत करण्यासाठी ध्यान किंवा स्वतःसोबतचा वेळ महत्वाचा ठरतो.

तुम्ही पूर्णपणे थकलेले असाल

दैनंदिन कामात माणूस शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे थकतो. पण लोक काय म्हणतील या भीतीने आपण आराम टाळतो. लक्षात ठेवा, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कामाचा ताण घेतल्याने बर्नआउट होतं आणि त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो. त्यामुळे थकलात तर आराम करा.
जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या

भावनांचा आदर करत नाही

अशा नातेसंबंधाचा तुमच्या आत्मविश्वासावर मोठा परिणाम होतो. जर कोणी सतत तुमची उपेक्षा करत असेल किंवा फक्त गरज असताना तुमच्याशी संपर्क करत असेल, तर त्या नात्यापासून दूर होणं हेच योग्य. हे तुमच्या भावनिक सुरक्षिततेसाठी आवश्यक असते.

सर्दी खोकल्यामुळे हैराण झाला आहात! मग चमचाभर मधात मिक्स करा ‘हा’ शक्तिशाली पदार्थ, कफ होईल कायमचा गायब

स्वतःच्या मतांना प्राधान्य द्या

जीवनातील मोठे निर्णय घ्यायचे असतील तेव्हा करिअर, नाती, भविष्य प्रत्येक मोठा निर्णय घेताना इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या प्राधान्यांवर विश्वास ठेवा. इतरांना खुश करण्यासाठी घेतलेले निर्णय पुढे जाऊन तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: 5 situations where being selfish is the right thing to do self care tips lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • fitness secret
  • lifestyle news
  • lifestyle tips
  • self care tips

संबंधित बातम्या

तुम्हालाही Breast cancer तर नाही? कपडे घालताना ही गोष्ट नक्की तपासा, वेळीच टाळता येईल गंभीर समस्या
1

तुम्हालाही Breast cancer तर नाही? कपडे घालताना ही गोष्ट नक्की तपासा, वेळीच टाळता येईल गंभीर समस्या

Breast Milk Jaundice: आईच्या दुधामुळे नवजात बाळाला कावीळ का होते? जाणून घ्या मुख्य कारण
2

Breast Milk Jaundice: आईच्या दुधामुळे नवजात बाळाला कावीळ का होते? जाणून घ्या मुख्य कारण

तुमचे पायही सतत सुजतात का? मग घरच्या घरी या 5 सवयींचे पालन करा, काही दिवसांतच मिळेल आराम
3

तुमचे पायही सतत सुजतात का? मग घरच्या घरी या 5 सवयींचे पालन करा, काही दिवसांतच मिळेल आराम

Republic Day 2026 : तिरंगा फडकवायचा, पण नियम माहिती आहेत का? पालकांनी मुलांना नक्की शिकवा ‘या’ महत्त्वाच्या बाबी
4

Republic Day 2026 : तिरंगा फडकवायचा, पण नियम माहिती आहेत का? पालकांनी मुलांना नक्की शिकवा ‘या’ महत्त्वाच्या बाबी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.