कोलेस्ट्रॉलने भरलेल्या रक्तवाहिन्या कायमच्या होतील स्वच्छ!
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव आणि आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. नियमित तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात निरोगी पेशी तयार करते तर खराब कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा करते. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला घाणेरडा चिकट थर रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)Triglyceride cholesterol
समोसा-जलेबी विरुद्ध पिझ्झा-बर्गर! कोणत्या पदार्थांमध्ये आहेत जास्त फॅट आणि साखर? जाणून घ्या सविस्तर
रोजच्या आहारात विटामिन सी युक्त आंबट फळांचे नियमित सेवन करावे. या फळांच्या सेवनामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी होते आणि रक्तवाहिन्या स्वच्छ होण्यास मदत होते. नियमित द्राक्ष, लिंबू, संत्री, मोसंबी इत्यादी आंबट फळांचे सेवन केल्यास शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. यामध्ये फायबर, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आणि भरपूर जीवनसत्त्वे आढळून येतात. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आंबट फळे खावीत.
निरोगी आरोग्यासाठी प्रभावी फळ म्हणजे सफरचंद. सकाळच्या नाश्त्यात नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात साचलेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर पडून जाईल. याशिवाय कोलेस्ट्रॉलची भरलेल्या नसा स्वच्छ होतील. सफरचंदमध्ये असलेले पॉलीफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरात साचलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. हृदयविकाराच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी नियमित एक सफरचंद खावे.
सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित एक तरी केळ खावं. केळी खाल्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. केळी खाल्यामुळे शरीरात साचलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल बाहेर पडून जाते.
कोलेस्टेरॉल म्हणजे काय?
कोलेस्टेरॉल हा एक प्रकारचा चरबी आहे जो निरोगी पेशींसाठी आवश्यक आहे, परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यास ते हानिकारक ठरू शकते. ते रक्तात लिपोप्रोटीनद्वारे वाहून नेले जाते:
उच्च कोलेस्ट्रॉलचे दुष्परिणाम काय आहेत?
रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा झाल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. हातपायांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे वेदना, सुन्नपणा किंवा पेटके येऊ शकतात, विशेषतः व्यायामादरम्यान. जर रक्ताच्या गुठळ्यामुळे मेंदूतील धमनी ब्लॉक झाली तर त्यामुळे स्ट्रोक होऊ शकतो.
कोलेस्ट्रॉल जास्त असल्यास काय करावे:
उच्च कोलेस्ट्रॉल शोधण्यासाठी नियमित रक्त चाचण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. संतृप्त आणि ट्रान्स फॅट्स मर्यादित करा आणि फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचे सेवन वाढवा.