समोसा-जलेबी विरुद्ध पिझ्झा-बर्गर! कोणत्या पदार्थांमध्ये आहेत जास्त फॅट आणि साखर?
पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये जिलेबी, भजी, गरमागरम सामोसे इत्यादी पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. पावसाची मजा गरमागरम सामोसा किंवा भजी झाल्याशिवाय पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही. मात्र मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर सामोसा आणि जिलेबीची मोठी चर्चा रंगली आहे. याशिवाय यामुळे अनेकांची मन दुखावली आहेत. भारतामध्ये लठ्ठपणा मोठ्या वेगाने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने एम्स नागपूरसह सर्व केंद्रीय संस्थांना ‘तेल आणि साखर मंडळ’ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामुळे सतत जिलेबी किंवा सामोसे खाल्ल्यामुळे शरीराचे नेमके किती नुकसान होईल, याची जाणीव लोकांना होईल. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे समोसे आणि जिलेबी खाणाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सामोसे आणि जिलेबी बनवण्यासाठी किती वेळ लागतो? कोणत्या पदार्थामध्ये जास्त फॅट आणि साखर असते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
भारत सरकारने जाहीर केलेल्या अहवालात सांगितले आहे की, समोसे, जलेबी, पकोडे, वडा पाव आणि चहा बिस्किटे इत्यादी भारतासह जगभरात लोकप्रिय असलेले पदार्थ सिगारेटप्रमाणेच आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. तसेच सरकारकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यामध्ये हे पदार्थ बनवण्यासाठी कोणते घटक वापरले जातात? किती साखर, तेल आणि ट्रान्स फॅट, याविषयी सुद्धा माहिती दिली आहे.
मागील वर्षभरात भारतात लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका झपाट्याने वाढू लागला आहे. लॅन्सेट जर्नलच्या अंदाजानुसार, २०५० पर्यंत ४४ कोटी भारतीयांना लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. लठ्ठपणाची समस्या वाढू लागल्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
सरकारने स्पष्ट केल्यानुसार, समोसा, जलेबी, भजी, लाडू हे पारंपरिक भारतीय पदार्थ आहेत. त्यामुळे या पदार्थांवर कोणतीही बंदी घातली जाणार नाही. पण ग्राहकांना तुम्ही ज्या पदार्थांचे सेवन करता, ते किती निरोगी आहे आणि किती अस्वास्थ्यकर आहे इत्यादी सर्व बाबी माहित असणे आवश्यक आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वच लोक निरोगी अन्नपदार्थांकडे वळतील. त्यामुळे लोकांचा दृष्टिकोन बदलेल.
समोसा आणि जलेबीवर करण्यात आलेल्या टीकेनंतर, पिझ्झा आणि बर्गर देखील खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. बरेच लोक म्हणतात की जर समोसा आणि जलेबी आरोग्यासाठी धोकादायक आहेत, तर पिझ्झा आणि बर्गर किती आरोग्यदायी आहेत? सरकारच्या या पावलानंतर बाजारात समोसा-जलेबी विरुद्ध पिझ्झा-बर्गर यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणते पदार्थ आरोग्यासाठी चांगले आहेत, याबद्दल सांगणार आहोत.
१०० ग्रॅम किंवा एका समोशामध्ये २६१ कॅलरीज असतात. एकूण चरबी – १७ ग्रॅम
सॅच्युरेटेड फॅट – ७.१ ग्रॅम
ट्रान्स फॅट – ०.६ ग्रॅम
पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट – ४.८ ग्रॅम
मोनोअनसॅच्युरेटेड फॅट – ४.२ ग्रॅम
१०० ग्रॅम किंवा २ जिलेबीमध्ये ३०० कॅलरीज असतात.
एकूण चरबी – ७ ग्रॅम
सॅच्युरेटेड फॅट – ४.२ ग्रॅम
ट्रान्स फॅट – ०
पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट – ०.४ ग्रॅम
मोनोअनसॅच्युरेटेड फॅट – २ ग्रॅम
कोलेस्टेरॉल – १७ मिग्रॅ
१०० ग्रॅम किंवा पिझ्झाच्या १ स्लाईसमध्ये २८५ कॅलरीज असतात.
एकूण चरबी – १० ग्रॅम
सॅच्युरेटेड फॅट – ४.८ ग्रॅम
ट्रान्स फॅट – ०.३ ग्रॅम
पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट – १.८ ग्रॅम
मोनोअनसॅच्युरेटेड फॅट – २.८ ग्रॅम
कोलेस्टेरॉल – १८ मिग्रॅ
एका बर्गरमध्ये म्हणजेच १०० ग्रॅममध्ये २२६ कॅलरीज असतात.
एकूण चरबी – १२ ग्रॅम
सॅच्युरेटेड फॅट – ४ ग्रॅम
पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट – ३.१ ग्रॅम
मोनोअनसॅच्युरेटेड फॅट – ४.७ ग्रॅम
कोलेस्टेरॉल – ३३ मिग्रॅ
सोडियम – ३४२ मिग्रॅ