केसांना एरंडेल तेल लावण्याचे फायदे
केसांच्या घनदाट आणि लांबलचक वाढीसाठी केसांना तेल लावले जाते. मागील अनेक वर्षांपासून केसांच्या वाढीसाठी नारळाचे तेल, बदामाचे तेल, शिकेकाई इत्यादी गोष्टी वापरल्या जात आहे. पण हल्ली फँशनच्या युगात आयुर्वेदिक गोष्टींकडे दुर्लक्ष करून केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. पण केसांच्या वाढीसाठी केमिकल युक्त प्रॉडक्ट लावून केसांची वाढ केली जात आहे. मात्र यामुळे काही काळच केसांचे सौदंर्य टिकून राहते पण कालांतराने केस पुन्हा होते तसेच होऊन जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेलाचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. एरंडेल तेल केसांच्या वाढीसाठी अतिशय गुणकारी आहे. या तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे केसांची वाढ होते.(फोटो सौजन्य-istock)
एरंडेल तेलात अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे केसांची वाढ होऊन केस मऊ दिसतात. सतत वेगवेगळे शॅम्पू आणि केमिकल लावून टाळूवर इन्फेक्शन झाल्यास तुम्ही एरंडेल तेल लावून बरे करू शकता. हे तेल केसांमधील घाण काढून टाकून केस स्वच्छ करतात. ल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर करावा. त्यामुळे केस गळतीच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेलात एरंडेल तेल मिक्स करून लावा. यामुळे तुमचे केस घनदाट आणि सुंदर दिसतील.
हे देखील वाचा: जखम झाल्यानंतर हळदीचे दूध पिण्यास का दिले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती
केसांना एरंडेल तेल लावण्याचे फायदे
केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेल लावल्यास केस सुंदर आणि चमकदार दिसतील. केसांवर एरंडेल तेलाचा थेट वापर करू नये. यामुळे केसांना हानी पोहचू शकते. तेल तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा एरंडेल तेल घेऊन गरम करून घ्या. त्यानंतर त्यात २ चमचे खोबरेल तेल टाकून पुन्हा एकदा मिक्स करा. तर दुसऱ्या टोपात पाणी गरम करून त्यात तेलाची वाटी ठेवून कोमट गरम करा. तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करून तेल थंड होण्यासाठी ठेवा.
हे देखील वाचा: त्वचेवरील पिंपल्स आणि डाग घालवण्यासाठी नियमित करा ‘या’ पानाचे सेवन, त्वचेसाठी ठरेल वरदान
केसांना तेल लावण्याआधी केस विंचरून घ्या. जेणेकरून केसांमध्ये गुंता होणार नाही. केसांना तेल लावताना लाकडी कंगवा घेऊन त्यावर तेल टाकून केसांच्या मुळांना तेल लावा. त्यानंतर मुळांना हलक्या हाताने मसाज करा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करू शकता. या पद्धतीने केसांना तेल लावल्यास तुम्ही केसांची वाढ नक्कीच होईल.