जखम झाल्यानंतर हळदीचे दूध पिण्यास का दिले जाते?
चालताना किंवा धावताना प्रत्येकालच छोट्या मोठ्या जखमा होत असतात. अनेकदा पाय घसरून पडल्यानंतर सुद्धा जखम होते. जखम झाल्यानंतर योग्य वेळी जखमेकडे लक्ष दिले नाहीतर ही जखम आणखीन मोठी होण्याची शक्यता असते.जखम किंवा कोणतीही मोठी दुखापत झाल्यानंतर अनेक असह्य वेदना होऊ लागतात. या वेदनांकडे काहीवेळा दुर्लक्ष केले जाते. पण दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध उपचार घेणे गरजेचे आहे. पडल्यानंतर किंवा जखम झाल्यानंतर जखमेवर बाम किंवा हळद लावली जाते. यामुळे काहीवेळ आराम मिळतो. पण एकदा जखम झालेल्या ठिकाणी वेदना होण्यास सुरुवात होते.
पडल्यानंतर किंवा लागल्यावर जखम झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आहारात बदल करावा. जखम झाल्यानंतर आहारात व्हतुळ पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे जखम आणखीन वाढण्याची शक्यता असते. अनेकदा जखम झाल्यानंतर हळदीचे दूध पिण्यास दिले जाते. पण तुम्हाला प्रश्न पडला असेलनं जखम झाल्यानंतर हळदीचे दूध का पिण्यास दिले जाते? चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: ऑफिसमध्ये गेल्यानंतर सतत झोप येते का? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन
प्रत्येक स्वयंपाक घरात हळदी असते. हळदीचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. जेवणातील पदार्थांमध्ये हळद वापरल्यास पदार्थाचा रंग आणि चव वाढण्यास मदत होते. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा गुणकारी घटक आढळून येतो. ज्यामुळे आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. हळदीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच कर्क्युमिन शरीरातील जखमेवर वेदनाशामक म्हणून काम करते. त्यामुळे जखम झाल्यानंतर हळदीचे दूध पिण्यास दिले जाते.
जखम झाल्यानंतर हळदीचे दूध पिण्यास का दिले जाते?
हे देखील वाचा: शरीरासाठी अँटीऑक्सिडंट फार महत्वाचे; ‘या’ आहाराचे करा सेवन, सदैव निरोगी राहाल
हळदीमध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते. ज्यामुळे आरोग्यालासुद्धा फायदा होतो. तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. शरीरातील फ्री रॅडिकल्सच्या हानीपासून हळद शरीराचा बचाव करते. हळदीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे जखम झालेल्या ठिकाणी पेशी दुरुस्त होतात. त्यामुळे हळदीचे दूध प्यावे. नियमित हळदीचे दूध प्यायल्यास आरोग्य सुधारते.