केसांमध्ये कोंडा होण्यामागे काय आहेत कारण?
सर्वच ऋतूंमध्ये महिला आणि पुरुषांच्या केसांमध्ये कोंडा होतो. कोंडा झाल्यानंतर केसांमध्ये मोठ्या प्रमाणावर खाज येऊ लागते. अशावेळी केसांमधील कोंडा घालवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण वातावरणातील बदलांचा परिणाम आपल्या आरोग्यावर जसा दिसून येतो तसाच परिणाम केसांवर सुद्धा दिसून येतो. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केस चिकट किंवा तेलकट होऊन जातात. तेलकट झालेले केस स्वच्छ केले नाही तर केस आणखीन खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये केसांची योग्य ती काळजी घ्यावी. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर टाळूला खाज येते.कोंडा होऊ नये म्हणून अनेक उपाय केले जातात, पण कोंडा पुन्हा होतो. आयुर्वेदतज्ज्ञांच्या मते, इमोशनल व्यक्तींच्या डोक्यात नेहमीच खूप कोंडा असतो. हे वाचून तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल ना कोंडा आणि इमोशन्सचा नेमका संबधं काय? चला तर जाणून घेऊया कोंडा होण्यामागे नेमकी काय कारण आहेत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: दागिने स्वच्छ करण्यासाठी सोनाराकडे न जाता ‘या’ पद्धतीने करा स्वच्छ, दागिन्यांना येईल झळाळी