दागिने स्वच्छ करण्यासाठी 'या' गोष्टींचा वापर करा
सोनं, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी केल्यानंतर काही दिवसांनी त्याची चमक हळूहळू कमी होऊ लागते. दागिन्यांची हरवलेली चमक पुन्हा परत मिळवण्यासाठी सोनाऱ्याच्या दुकानात जाऊन दागिने पॉलिश करावे लागतात. पण सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही हे दागिने घरच्या घरी सुद्धा पॉलिश करू शकता. दागिने पॉलिश करण्यासाठी सोनाऱ्याच्या दुकानात जाण्याची गरज नाही. घरातील हा पदार्थ वापरून दागिन्यांना पॉलिश करता येते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोनं चांदीचे दागिने घराच्या पॉलिश करण्यासाठी कोणता पदार्थ वापरावा? दागिने पॉलिश करण्याची योग्य पद्धत काय आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
दागिने स्वच्छ करण्यासाठी ‘या’ गोष्टींचा वापर करा
किमतीने महाग असलेले सोन्याचे दागिने घरी स्वच्छ कसे करावे? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. दागिने स्वच्छ करण्यासाठी एका वाटीमध्ये भांडी घासण्याचा साबण घेऊन त्यात २ मिनिटं दागिने भिजत ठेवावे. त्यानंतर ब्रशच्या सहाय्याने दागिने व्यवस्थित घासून स्वच्छ करून घ्या. पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले दागिने व्यवथित पुसून दागिन्यांच्या डब्यात भरून ठेवा. यामुळे दागिन्यांवरील पाण्याचे डाग निघून जातील आणि तुमचे दागिने पुन्हा एकदा नव्या सारखे दिसतील.
हे देखील वाचा: पावसाळ्यात हेअर स्पा करताय? तर ‘अशा’ पद्धतीने घ्या केसांची काळजी
दागिने स्वच्छ करण्यासाठी ‘या’ गोष्टींचा वापर करा
चांदीचे दागिने पॉलिश करण्यासाठी कपड्याचा वापर करावा. कपड्याच्या मदतीने दागिन्यांवरील घाण स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात दागिने भिजत ठेवावे. ५ मिनिटं दागिने व्यवस्थित भिजल्यानंतर सफेद टूथ पेस्टच्या मदतीने दागिने स्वच्छ करून घ्यावे. स्वच्छ करून घेतलेले दागिने कपड्याच्या सहाय्याने पुसून नंतर वापरावे.
दागिने स्वच्छ करण्यासाठी ‘या’ गोष्टींचा वापर करा
सणसमारंभात अधिक उठावदार आणि सुंदर दिसण्यासाठी हिऱ्यांचे दागिने घातले जातात. हिऱ्यांचे दागिने स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यात दागिने काहीवेळ भिजवून ठेवा. त्यानंतर ब्रशच्या मदतीने दागिने स्वच्छ करून घ्या. हिऱ्यांचे दागिने जास्त घासू नये. असे केल्यास दागिन्यांमधील हिरा पडू शकतो.