
पांढरी दाढी आणि लाल कपडे असलेला सांताक्लॉज प्रत्येकाला माहितेय. पण पुर्वीच्या काळी संताक्लॉजचे कपडे कधी हिरव्या तर कधी निळ्या रंगाचे होते. युरोपीयन आणि अमेकिरन काही जुन्या आणि दुर्मिळ पुस्तकांमध्ये सांताक्लॉजची काही चित्रं नमूद केली आहेत. पुर्वीच्या काळी चर्चमध्ये असलेला सांताक्लॉज हा वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये असायचा असं या काही चित्रांमधून सिद्ध होतं. काही अमेरिकन पुस्तकातील चित्रांनुसार सांताक्लॉजचे जाडसर लांबच्या लांब झगा, आणि वेगवेगळ्या रंगाचे जाडसर स्वेटर असा त्याचा लुक असायचा. आता हे पुस्तकातील चित्र म्हणजे कल्पनिक आहे की खरं याबाबत संभ्रम असला तरी असं म्हणतात की, सांताक्लॉजचे कपडे पुर्वी वेगवेगळ्या रंगाचे होते.
तो एक काळ होता ज्याने सांताक्लॉजला लाल रंगाच्या कपड्यांवर शिक्कामोर्तब केला. तर झालं असं की, 1930 च्या सुरुवातीला कोका-कोला या ब्रॅंडला आपल्या प्रॉडक्टची जाहिरात करायची होती. अमेरिकेत बर्फ असल्याने हिवाळ्यात कोणीही कोल्ड्रिंक पिणार नाही ते कंपनीला पुरतं माहित होतं. पण प्रॉडक्ट तर विकलेच पाहिजे पण करणार काय तर कंपनीनेएक शक्कल लढवली. लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी त्यांनी सांताक्लॉजला जाहिरातीत आणलं.
या ब्रॅन्डच्या जाहिरातीसाठी सनडब्लॉम नावाच्या एका कलाकाराची मदत घेण्यात आली. लाल रंगाच्या कपड्यातला हा सांता हसऱ्या चेहऱ्याचा, सगळ्यांशी मैत्री करणारा असा दाखवण्यात आला. या जाहिरातीतील सांताने घातलेला कोट हा कोका-कोलाच्या ब्रँडच्या रंगाशी जुळत होता. सांताक्लॉज तयार करताना सनडब्लॉमने कार्टूनचा आधार न घेता हा सांता खरा वाटावा यासाठी मॉडेलसची निवड केली. हा सांता काल्पनिक नाही तर लोकांना आपला वाटावा आणि त्याच्याबद्दल प्रेम वाटावं अशी यामागची भावना होती.
हिवाळ्यात लोकं कोड्रिंक पिणार नाही पण सांताक्लॉजने सांगितलं तर नक्कीच पिणार हे असं कोकाकोला कंपनीला वाटलं आणि त्याचआधारे त्यांनी जाहिरात केली आणि ती यशस्वी देखील झाली.
सनडब्लॉमने तयार केलेली सांताक्लॉजची ही प्रतिमा मासिकात प्रसिद्ध झाली. लाल कोटातील हा सांता लोकांना आवडायला लागला. हळूहळू मासिकातील हा सांता जगभर प्रसिद्ध झाला आणि पुढील काळात सांताक्लॉज लाल रंगाच्या कपड्यात दिसू लागला. आज अनेक ठिकाणी सांताक्लॉज पांढरी दाढी आणि लाल रंगाच्या कपड्यात दिसतो त्याचं कारण कोका कोला कंपनीची जाहिरात आहे.
Ans: सांताक्लॉजच्या लाल कपड्यांची ओळख प्रामुख्याने 1930 च्या दशकात कोका-कोला कंपनीच्या जाहिरातींमुळे तयार झाली. या जाहिरातींमध्ये लाल कोटातील, पांढरी दाढी असलेला सांताक्लॉज दाखवण्यात आला आणि हाच लुक पुढे जगभर लोकप्रिय झाला.
Ans: पूर्वीच्या काळात सांताक्लॉज हिरवे, निळे किंवा इतर रंगांचे कपडे घालत असल्याचे उल्लेख युरोपियन व अमेरिकन जुन्या पुस्तकांमध्ये आढळतात. त्याचा पोशाख निश्चित असा नव्हता.
Ans: अमेरिकन कलाकार हॅडन सनडब्लॉम (Haddon Sundblom) यांनी कोका-कोला कंपनीसाठी सांताक्लॉजची आजची ओळख तयार केली. त्यांनी सांताक्लॉजला हसरा, आपुलकीचा आणि खरा वाटावा असा दाखवला.