Gift Ideas : दरवर्षी २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. पारंपारिकपणे हा सण आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत किंवा आवडीच्या लोकांसोबत सोजरा केला जातो. या सणानिमित्त केक, नवीन सजावट आणि यासहच आपल्या लोकांनी काही खास भेटवस्तू गिफ्ट केल्या जातात. आपल्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा असेल तर त्यांना त्याच्या आवडीची सुंदर वस्तू गिफ्ट करा.
Christmas 2025 : ख्रिसमसला असं काय गिफ्ट करावं ज्याला पाहताच मन खुश होईल... यादीत या गोष्टींचा समावेश करा

कस्टमाईज गिफ्ट्स - तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीला कस्टमाईज नेम नेकलेस, फोटो-प्रिंट, पर्सनल कॅलेंडर २०२६, हँड-स्केच पोर्ट्रेट अशा वस्तू युनिक वस्तू गिफ्ट करु शकता.

ब्युटी अँड सेल्फ-केअर - मुलीच काय तर आजकाल मुलंही सेफ्ट केअरकडे विशेष लक्ष देऊ लागले आहेत. अशावेळी स्किनकेअर मिनी किट्स, परफ्यूम सेट्स, बॉडी स्पा हॅम्पर्स, हेअर केअर सेट्स, ऑरगॅनिक लिप बाम पॅक या गोष्टी परफेक्ट ठरतील.

फॅशन आणि स्टाइलिश भेटवस्तू - तुमची आवडती व्यक्ती फॅशनेबल असेल किंवा त्याला/तिला स्टायलिश गोष्टी आवडत असतील तर तुम्ही त्यांना लोकरीचे स्वेटर, हँडबॅग्ज, स्कार्फ आणि स्टोल्स, लेदर वॉलेट, सिल्व्हर ज्वेलरी सेट्स अशा गोष्टी गिफ्ट करु शकता.

टेक प्रेमींसाठी - गिफ्ट करत असलेला व्यक्ती जर टेक प्रेमी असेल तर तुम्ही त्याला वायरलेस इअरबड्स, स्मार्टवॉच, ब्लूटूथ स्पीकर, स्मार्ट एलईडी स्ट्रिप लाईट्स, मिनी पोर्टेबल प्रोजेक्टर अशा गोष्टी गिफ्ट करु शकता.

होम डेकोर गिफ्ट्स - याऐवजी तुम्ही काही अशा वस्तूही गिफ्ट करु शकता जी त्यांच्या घराची शोभा वाढवेल. यात सुगंधित मेणबत्त्या, मॅक्रामे भिंतीवरील हँगिंग्ज, टेबल लॅम्प, हाताने बनवलेले लाकडी शोपीस अशा गोष्टींचा समावेश होतो.






