Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?

राजस्थान म्हटलं की डोळ्यासमोर वाळवंट, सोनेरी वाळू आणि कडक उन्हाची प्रतिमा उभी राहते. मात्र भारतात एक असंही वाळवंट आहे, जिथे वाळूच्या प्रदेशासोबत कडाक्याची थंडी अनुभवायला मिळते. उंच पर्वतरांगांमध्ये वसलेला हा प्रदेश आपल्या अनोख्या हवामानामुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 23, 2026 | 08:02 AM
भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?

Follow Us
Follow Us:
  • भारतातील ‘थंड वाळवंट’ नेमकं कुठे आहे?
  • या वाळवंटात तापमान शून्याच्या खाली का जाते?
  • थंड वाळवंटाजवळ कोणती सुंदर पर्यटनस्थळे पाहता येतात?
जेव्हाही आपण राजस्थान या ठिकाणाविषयी बोलतो तेव्हा मनात उष्ण वातावरण आणि वाळवंटाचा विचार येतो. थर वाळवंट त्याच्या सोनेरी वाळू, उंच वाळूचे ढिगारे आणि भाजून काढणाऱ्या उष्णतेसाठी जगभर ओळखले जाते. राजस्थानच्या अनेक भागात वाळूचा विस्तीर्ण प्रदेश आणि प्रखर सूर्यप्रकाश पाहायला मिळतो. उन्हाळ्यात तापमान खूप वाढते आणि दिवसा वाळू इतकी गरम होते की यावरुन चालणेही कठीण होऊन बसते. पण विचार करा, जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, वाळवंटात तुम्हाला उष्ण वाऱ्यांशिवाय थंड बर्फाळ वाऱ्यांचा अनुभव घ्यायला मिळेल तर तुम्हाला हे पटेल का? हिवाळ्यात तापमान शून्याखाली जाऊ शकते. म्हणूनच याला ‘थंड वाळवंट’ म्हटले जाते.

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित

वास्तविक भारताचे हे थंड वाळवंट लडाखच्या लेह जिल्ह्यात वसले आहे. हा परिसर समुद्र किनाऱ्यापासून ३००० ते ३५०० मीटर उंचावर वसला आहे. म्हणजेच अनेक ठिकाणी याची उंची १०,००० ते ११,५०० फूटाहून अधिक आहे. जास्त उंची, अत्यंत कमी पाऊस आणि थंड हवामानामुळे येथील भूगोल हा राजस्थानच्या उष्ण वातावरणाहून एकदम वेगळा आहे. इथे तुम्हाला सोनेरी वाळू आणि यासोबतच दगडी डोंगर, कोरडी खोरी आणि ओसाड जमिनीचे विस्तीर्ण प्रदेश पाहायला मिळतील.

थंड वाळवंट का म्हटले जाते?

लेहच्या थंड वाळवंटाची खासियत म्हणजे इथले अनोखे वातावरण. भव्य हिमालय पर्वतरांगांच्या मागे वसलेल्या या उंच पर्वतरांगांमुळे मान्सूनचे वारे या प्रदेशात पोहचू शकत नाही ज्यामुळे पावासाचे प्रमाण फार कमी पाहायला मिळते. यासोबतच इथे उन्हाळाही फार काळ नसतो. हिवाळ्यात येथील परिस्थिती तीव्र बनते. हिवाळ्यात इथे भरपूर थंडावा असतो जो कधीकधी सहन होण्यापलिकडचा ठरतो. माहितीनुसार, याकाळात साधारण तापमान -२० ते -३५ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचते. पावसाळ्यात पावसाची कमतरता आणि थंडी जास्त असल्याने इथे हिरवळ देखील फार कमी पाहायला मिळते. यामुळेच इथला प्रदेश खडकाळ डोंगरं, कोरडी जमीन आणि वाळवंटाने भरलेला असतो.

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही

अनेक सुंदर ठिकाणांना देऊ शकता भेट

लेह हा जिल्हा नैसर्गिकरित्या सुंदर असून इथे इतिहास आणि संस्कृतीची अनोखी झलक पाहयला मिळते. इथे उपस्थित पांगोंग त्सो सरोवर आपल्या सुंदरतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. इथे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे आणि वातावरणातील प्रकाशानुसार या तलावातील पाण्याचा रंग बदलत राहतो. याशिवाय इथे लेह पॅलेस, हेमिस मठ, थिक्से मठ आणि दिस्किट मठ अशी काही प्रमुख ठिकाणे आहेत जिथे पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही लडाखमधील धार्मिक आणि बाैद्ध संस्कृतीला जवळून जाणून घेऊ शकता.

 

Web Title: Cold desert in india ladakh leh thar desert pangong lake tourist places

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 08:02 AM

Topics:  

  • Leh Ladakh
  • travel news

संबंधित बातम्या

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही
1

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित
2

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.