(फोटो सौजन्य: istock)
सर्व माहिती गोळा करा
आपली सहल सुरु करण्याआधीच निवडलेल्या ठिकाणाची सविस्तर माहिती गोळा करा. ठिकाणाचे नेमके लोकेशन, तेथील लोकप्रिय ठिकाणे, राहण्या-खाण्याची व्यावस्था आणि इतर. आधीच सर्व गोष्टी प्लॅन केल्या की सहल सुरळीत पार पडते. शिवाय, लहान-सहान गोष्टीत घेतलेली ही काळजी सोलो ट्रीपला अधिक आरामदायी आणि सुरक्षित बनवते.
लगेच प्रत्येकावर विश्वास ठेवू नका
एकट्याने फिरताना नवीन लोकांशी भेटी-गाठी होतात. पण या भेटीत लगेच कुणावरही जास्त विश्वास दाखवू नका. ठिकाणाविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकांसोबत संभाषण करु शकता. परंतु आपल्या पर्सनल गोष्टी, कुटुंबाची माहिती, हाॅटेलचे नाव किंवा इतर वैयक्तिक बाबी कुणासोबतही पहिल्याच भेटीत शेअर करु नका. जर एखादे ठिकाण निर्जन दिसत असेल तर तिथे जाणे टाळा. रात्री एकट्याने फिरताना गर्दीच्या ठिकाणांची निवड करा. जर रस्त्यात काही चुकीचे किंवा संशयास्पद वाटले तर लगेच त्या ठिकाणातून बाहेर पडा आणि विश्वासू व्यक्तीशी संपर्क साधा.
कुटुंबाला सर्व अपडेट देत रहा
सोलो ट्रीपच्या वेळी कुटुंबाला किंवा आपल्या विश्वासू मित्राला आपली अपडट देत राहणे महत्त्वाचे ठरते. त्यांच्यासोबत हॉटेलचा पत्ता, प्रवासाच्या तारखा आणि महत्त्वाचे फोन नंबर शेअर करा. दिवसातून एकदा तरी सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती देत राहा. मोबाईल फोनची बॅटरी संपू नये म्हणून सोबत पाॅवर बँक घेऊन फिरा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उत्साहाच्या भरात तुमच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नका. थोडी खबरदारी घेतल्यास आपण सुरक्षेसह आपली ट्रीप पूर्ण करु शकता.






