Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोलेस्टरॉलमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद झाल्या आहेत? मग नियमित करा ‘या’ पेयाचा आहारात समावेश

शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. ज्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात अर्जुनाच्या सालच्या चहाचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 03, 2024 | 10:04 AM
अर्जुनाच्या सालीचा चहा:

अर्जुनाच्या सालीचा चहा:

Follow Us
Follow Us:

जगभरात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयविकाराचा झटका येतो. हृदयाच्या नसांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर साचून राहिल्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात, ज्यामुळे हृदयाचे कार्य बिघडते. हृदयाचे कार्य बिघडल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. त्यामुळे सतत तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे टाळावे. अतिप्रमाणात तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यास शरीरात कोलेस्ट्रोलशिवाय रक्तामध्ये साखरेची पातळी वाढते. ज्यामुळे आरोग्य आणखीन बिघडू लागते. (फोटो सौजन्य-istock)

हृदयाचे कार्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या योग्य त्या सवयी फॉलो करून आरोग्याची काळजी घ्यावी. आयुर्वेदामध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठीच अनेक लाभदायक उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय फॉलो केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हृदयाच्या बंद झालेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यासाठी आयुर्वेदातील गुणकारी उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहून आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

हे देखील वाचा: दिवाळीत तेलकट पदार्थ खाऊन छातीमध्ये जळजळ होते? अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी प्या ‘हे’ गुणकारी पेय

हृदयाच्या बंद झालेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यासाठी आयुर्वेदातील गुणकारी उपाय:

धूम्रपान कमी करणे:

सतत धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांसोबतच हृदयाचे आरोग्य सुद्धा बिघडून जाते. धूम्रपान केल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. अल्कोहोलमुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नेहमीच वाढलेला असतो. त्यामुळे धूम्रपान करणे टाळावे. सतत धूम्रपान करू नये.

व्यायाम करणे:

निरोगी जीवनशैली जगण्यासाठी नियमित योगासने, व्यायाम करावा. योगासने, प्राणायाम केल्यामुळे शरीराला आणि मनाला शांती मिळते. तसेच हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. नियमित पोहणे, धावणे, चालणे, जॉग करणे, स्ट्रेंथ ट्रेनिंग इत्यादी गोष्टी केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल. नियमित व्यायाम केल्यास हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होत नाही.

हे देखील वाचा: हळद आणि मध खाण्याचे काय आहेत फायदे?

अर्जुनाच्या सालाचा चहा:

कोलेस्ट्रॉल वाढून हृदयाच्या बंद झालेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यासाठी अर्जुनाच्या सालीचा चहा प्यावा. या चहात असलेले गुणधर्म हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. या चहाचे सेवन तुम्ही कधीही करू शकता. अर्जुनाच्या सालीचा चहा बनवण्यासाठी १ किंवा २ कप पाण्यात अर्जुनाची साल टाकून व्यवस्थित उकळवून घ्यावी.त्यानंतर चहा गाळून चहाचे सेवन करावे. आयुर्वेदामध्ये अर्जुनाच्या सालीला विशेष महत्व आहे. या सालीचा चहा तुम्ही रिकाम्या पोटीसुद्धा पिऊ शकता. यामुळे आरोग्याला अधिक फायदे होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consume ayurvedic drinks to open up the cholesterol clogged arteries of the heart health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2024 | 10:04 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.