जळजळ पासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे
दिवाळी सणाला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो. दिवाळीच्या दिवसांमध्ये नवीन कपडे, फराळ, साफ सफाई इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण. दिवाळीच्या दिवसांमध्ये सतत तेलकट आणि गोड पदार्थांचे सेवन केले जाते. पण सतत या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे छातीमध्ये जळजळ आणि पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. दिवाळीमध्ये तेलकट आणि गोड पदार्थ खाल्ले जाते. पोटासंबंधित समस्या उद्भवल्यानंतर अपचन, ऍसिडिटी, आंबट ढेकर येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला छातीत होणाऱ्या जळजळ पासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यास पोटातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आराम मिळतो.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: पस्तीशीनंतर हार्मोन बॅलेन्ससाठी पुरुषांनी काय खावं?
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म पोटातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. आलं लिंबाचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम टोपात पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात आल्याचे तुकडे टाकून पाण्याला उकळी काढून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून आल्याचा रस गाळून त्यात लिंबाचा रस टाकून प्या. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. लिंबाच्या रसात आढळून येणारे विटामिन सी आरोग्यासाठी गुणकारी आहे.
दह्याचे सेवन केल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच दही शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते. दह्याचे सेवन केल्यामुळे पोटात आणि छातीमध्ये होणारी जळजळ कमी होते आणि पचनाचा त्रास कमी होतो. दह्यामध्ये साखर आणि पुदिना टाकून सरबत बनवून प्यावे. यामुळे पोट दुखू आणि इतर समस्यांपासून आराम मिळेल. दिवाळीमध्ये जळजळ होण्यास सुरुवात झाल्यानंतर ताक प्यावे.
नारळ पाणी शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते. शिवाय नारळ पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट आहे. ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी नारळ पाण्याचे सेवन करावे. पित्ताचा किंवा असिडिटीचा त्रास होण्यास सुरुवात झाल्यानंतर नारळ पाण्याचे सेवन करावे.
हे देखील वाचा: दिवाळीनंतर शरीरासोबत त्वचा करा डिटॉक्स! ‘या’ टिप्स फॉलो करून त्वचा करा पहिल्यासारखी सुंदर
ताज्या फळांचा रस आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. तुम्ही नियमित कोणत्याही फळाच्या रसाचे सेवन करू शकता. विटामिन सी युक्त फळांच्या रसाचे सेवन केल्यास आरोग्यासह त्वचेला अनेक फायदे होतील. फळांचा रस बनवताना त्यात थोडासा पुदिना आणि आलं टाकावे. यामुळे रस अजूनच आरोग्यदायी आणि पौष्टिक होतो.