
जेवण बनवण्यासाठी कोणते तेल वापरावे
स्वयंपाक करण्यासाठी तेलाचा वापर केला जातो.जेवणातील प्रत्येक पदार्थामध्ये तेल हे वापरले जाते. भाजी बनवताना, चपाती बनवताना इत्यादी सर्वच पदार्थांमध्ये तेलाचा वापर केला जातो. जेवणासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाची अचूक निवड केली नाही तर तब्येत बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे तेल विकत घेताना ते योग्य दर्जाचे आहे की नाही हे आधी तपासून घ्यावे. तेलाची खरेदी करायला गेल्यानंतर आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तेल दिसतात. त्यातील नेमकं कोणतं तेल विकत घ्यावे, असा प्रश्न सर्वच गृहिणींना पडतो.
बाजारात तेल विकत घ्याला घेल्यानंतर आपण शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल, सूर्यफुलाचं तेल, खोबरेल तेल, पाम तेल, ऑलिव्ह ऑईल, मोहरी तेल किंवा अॅव्होकॅडो तेल इत्यादी अनेक वेगवेगळे तेल उपलब्ध असतात. त्यातील नेमके कोणतं तेल खरेदी करावे? असा प्रश्न पडल्यानंतर आपण शेंगदाणा तेल, सोयाबीन तेलाला विशेष प्राधान्य दिले जाते. पण आरोग्यासाठी नेमके कोणते तेल चांगले आहे, यावर डॉक्टर श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे. स्वयंपाक करताना कोणत्या तेलाची निवड करावी? यावर त्यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
घरी किंवा इतर ठिकाणी स्वयंपाक करताना शेंगदाण्याचे तेल वापरावे. या तेलामध्ये आरोग्यासाठी गुणकारी असलेले आवश्यक घटक आढळून येतात. शेंगदाण्याच्या तेलामध्ये विटामिन सी असते, जे शरिरात अनसॅचुरेटेड फॅटच्या जागी सॅचुरेटेड फॅट तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रालचे प्रमाण नियंत्रणात राहते. त्यामुळे रोजच्या आहारात शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करावा.
जेवण बनवण्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर करू शकता. उत्तर भारतासह इतर अनेक राज्यांमध्ये जेवण बनवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. हृदयविकारांसारखे गंभीर आजार या तेलाचे सेवन केल्याने उद्भवत नाहीत. तसेच उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.
किंमतीला महाग असलेले ऑलिव्ह ऑईल आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. या तेलाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. ऑलिव्ह ऑईलमध्ये असलेल्या मोनोसॅच्युरेटेड फॅटी असतात.तसेच विटामिन, मिनरल्स, पॉलीफेनॉल्स आणि झाडांमध्ये आढळणारे मायक्रोन्यूट्रिएंट्स आढळून येतात.
तिळाच्या तेलाचा वापर जेवण बनवण्यासाठी केला जातो. या तेलामध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात. तसेच तिळाच्या तेलात ओमेगा 3, ओमेगा – 6 आणि ओमेगा -9 फॅटी ऍसिड असतात. या तेलाचे सेवन केल्याने आरोग्यासोबतच केस आणि त्वचेला देखील फायदे होतात.तिळाच्या तेलाचा आहारात समावेश केल्याने रक्त दाब नियंत्रणात राहातो.