जुन्या चाळणीपासून बनवा कपडे सुकवण्याचे क्लिप हँगर
नुकताच पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. पावसाळ्यात अनेक समस्या उद्भवत असतात, त्यातीलच एक म्हणजे कपडे सुकवण्याची समस्या. या ऋतूत सर्व ठिकाणी पाणी पाणी होते ज्यामुळे अनेकदा आपल्या गॅलरीतही पावसाचे पाणी साठू लागते. अशावेळी गॅलरीत कपडे सुकत घालणे चुकीचे ठरेल. अनेकजण या ऋतूत कपडे सुकवण्यासाठी नवीन हँगर हँगरखरेदी करत असतात. याच्या मदतीने अगदी सहज तुम्ही घरातच कपडे सुकत घालू शकता. मात्र आता तुम्हाला या हँगरसाठी पैसे देण्याची आवश्यकता नाही कारण आज आम्ही तुम्हाला घरातच हँगर कसा तयार करायचा याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत. ही ट्रिक वापरून तुम्ही घरेच हँगर तयार करू शकता आणि यात तुमचे पैसेही वाचतील.
आज आपण घराघरात वापरल्या जाणाऱ्या चाळणीपासूनच हँगर कसा तयार करायचा याची एक सोपी ट्रिक पाहणार आहोत. ही युनिक ट्रिक सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे सांगण्यात आली आहे. चला तर मग याचविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
दरम्यान ही भन्नाट ट्रिक @prajakta_salve_marathi नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. त्यातच आता या ट्रिकचा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, पावसाळ्यात कपडे सुकविण्यासाठी फक्त गाळणीचा वापर करा असे लिहिण्यात आले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, 40 rs मीटर ही दोरी. 20 ru ची चाळणी…… ह्या क्लिप 20rs पाकीट…… अहो त्या पेक्षा 50 रुपया मधे भेटत ओ क्लिप हँगर तर काहींना ही ट्रिक फारच आवडली आहे.