dinvishesh
ता : 24 – 5- 2023, बुधवार
तिथी : संवत्सर
मिती 3, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ शुक्ल पक्ष पंचमी 27:00
सूर्योदय : 5:44, सूर्यास्त : 6:53
सूर्योदयकालीन नक्षत्र – पुनर्वसु 15:05, योग – गंड 17:18 नंतर वृद्धी, करण- बव 13:56, नंतर बालव 27:00 पश्चात कौलव
केतू – तूळ
राहु काळ : दुपारी 12:00 से 1:30
शुभ अंक : 5, 1, 4
शुभ रत्न : बुधासाठी पन्ना
शुभ रंग : पांढरा, फिकट राखाडी
२०१९: सुरत, गुजरात – मध्ये लागलेल्या आगीत २२ विद्यार्थ्यांचे निधन.
२००१: शेर्पा तेब्बा त्रेथी – १८ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शीखर सर करणारा सर्वात लहान व्यक्ती ठरला.
२०००: भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) – इन्सॅट-३ बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
१९९४: वर्ल्ड ट्रेड सेंटर, न्यूयॉर्क – २६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
१९९१: एरिट्रिया – देशाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९७६: काँकॉर्ड विमान – या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने उडणाऱ्या विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू झाली.
१९४०: इगोर सिकोरसकी – यांनी एका-रोटर हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण केले.
१९०६: रिट्झ हॉटेल, लंडन – सुरवात.
१८८३: ब्रूकलिन ब्रिज, न्यूयॉर्क – वाहतुकीसाठी खुला झाला.
१८४४: सॅम्युअल मोर्स – यांनी स्वत:विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश पाठवला.
१६२६: पीटर मिन्युईट – यांनी स्थानिक लोकांकडून मॅनहटन बेट २४ डॉलरला विकत घेतले.
१९७७: जीत गांगुली – भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक आणि गायक
१९७३: शिरीष कुंदर – भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक
१९६९: मंदार आगाशे – भारतीय संगीत दिग्दर्शक आणि उद्योगपती
१९५५: राजेश रोशन – संगीतकार
१९४१: बॉब डायलन – अमेरिकन गायक-गीतकार आणि निर्माते – नोबेल पारितोषिक
१९४०: जोसेफ ब्रॉडस्की – रशियन-अमेरिकन कवी आणि निबंधकार – नोबेल पारितोषिक (निधन: २८ मे १९९६)
१९३३: हेमचंद्र दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू (निधन: १९ डिसेंबर १९९९)
१९२४: जादूगार रघुवीर – भारतीय जादूगार (निधन: २० ऑगस्ट १९८४)
१९०५: मिखाईल शोलोखोव्ह – रशियन कादंबरीकार आणि लेखक – नोबेल पारितोषिक (निधन: २१ फेब्रुवारी १९८४)
१८१९: राणी व्हिक्टोरिया – ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य करणाऱ्या राणी (निधन: २२ जानेवारी १९०१)
१६८६: डॅनियल फॅरनहाइट – फॅरेनहाइट स्केल विकसित करणारे जर्मन शास्त्रज्ञ (निधन: १६ सप्टेंबर १७३६)
२०११: हकीम अली झरदारी – भारतीय-पाकिस्तानी व्यापारी आणि राजकारणी (जन्म: ९ डिसेंबर १९३१)
२०००: मजरुह सुलतानपुरी – शायर, गीतकार आणि कवी – दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: १ ऑक्टोबर १९१९)
१९८४: विन्स मॅकमोहन सिनियर – डब्ल्यूडब्ल्यूई (WWE)चे संस्थापक (जन्म: ६ जुलै १९१४)
१९५०: आर्चिबाल्ड वावेल – भारताचे ४३वे गर्वनर जनरल (जन्म: ५ मे १८८३)