फोटो सौजन्य: iStock
जगातील अनेक सुंदर क्षणांपैकी एक क्षण म्हणजे एका मुलाचे आई किंवा वडील बनणे. पण जसजसे मुलं मोठी होत जातात तसतसे पालक सुद्धा कठोर होत जातात. हल्लीच्या मुलांना देखील सांभाळणे काठी झाले आहे, ज्यामुळे अनेकदा पालकांना कठोर व्हावे लागते. यालाच इंग्रजीमध्ये स्ट्रिक्ट पॅरेंटिंग असे म्हणतात.
पॅरेंटिंगचे अनेक प्रकार आहेत ज्याला आपण मराठी भाषेतून जाणून घेऊया. हुकूमशाही पालक, आज्ञाधारक पालकत्व, आणि दुर्लक्षित पालकत्व. या सर्वांमध्ये, हुकूमशाही पालकत्व म्हणजेच ऑथोरिटैरियन पेरेंटिंग सर्वात कठोर मानले जाते. यामध्ये पालक आपल्या मुलांना सक्त सूचना देताना दिसतात.
मांस-मच्छी न खाण्यामुळे झालाय हाडांचा सांगाडा, विटामिन B12 साठी खा FSSAI ने सांगितलेले 5 पदार्थ
काही वेळेस आपल्या मुलांबरोबर कठोर राहिल्याने फायदा होतो. पण याचे नुकसान देखील होऊ शकते. यामध्ये मुलं आपल्या आई वडिलांना घाबरून त्यांची आज्ञा मनात असतात. कठोर पालकत्वात पालक त्यांच्या मुलांची छोटीशी चूक देखील सहन करू शकत नाहीत. आणि म्हणूनच ते त्यांच्या मुलांना काही नियम घालून देतात. यामुळे एक लक्ष्मणरेखा निर्माण होते, ज्यामध्ये मुलं पूर्णपणे सुरक्षित आहे, परंतु जर मुलाने ती ओलांडली तर मुलाला नक्कीच शिक्षा होते. या प्रकारच्या पालकत्वामुळे, मूल ताबडतोब आपल्या मोठ्यांचे पालन करते आणि त्यांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतःच्या भावनांची पर्वा करत नाही.
दुःखी आणि उदास बालपण: जेव्हा मुलाला काही नियम पाळावे लागतात ज्यात तो आनंदी नसतो, तेव्हा त्याला त्याच्या भावना उघडपणे व्यक्त करता येत नाही. यामुळे त्याला वाईट वाटू लागते जे त्याला नैराश्याकडे खेचते. म्हणूनच पालकांनी नेहमी मुलांना समजून घेणे फार महत्वाचे आहे.
आंघोळ केल्यानंतरही शरीराचा कोणता भाग राहतो घाण? कोणता अवयव करावा अधिक स्वच्छ जाणून घ्या
अँटी सोशल वर्तणूक समस्या: कठोर पालकत्वाने वाढलेली मुले लोकांशी फार मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. ते आतून घाबरतात त्यामुळे ते अँटी सोशल बनतात. म्हणून मुलांना मुक्त वातावरण जगू द्या, त्यांना जे बोलावेसे वाटते, जे करावेसे वाटते ते करू द्या.
चोरी आणि खोटे बोलणे: चुका केल्याबद्दल फटकारले जाण्याच्या भीतीने मुलं खोटं बोलू लागतात. इच्छा पूर्ण न झाल्यास चोरी करणे, खोटे बोलणे इत्यादी चुकीच्या मार्गांचा अवलंब देखील ते करण्यास धजावत नाही. अशावेळी पालकांनी मुलांना एक मित्र म्हणून समजून घेण्याची गरज आहे.