आंघोळ केल्यानंतरही शरीराच्या कोणत्या भागात राहते घाण साचून
मानवी शरीर ही एक अद्भुत निर्मिती आहे ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक तथ्ये दडलेली आहेत. आपल्या हाडांची ताकद, आपल्या मेंदूची गुंतागुंत आणि आपल्या शरीराच्या विविध अवयवांची अद्भुत क्षमता आपल्याला नेहमीच थक्क करत असते. शरीराच्या प्रत्येक अवयवाला काही ना काही महत्त्व असते. आपल्यापैकी बरेच जण आपले शरीर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी दररोज आंघोळ करतात.
आपले शरीर आणि केस स्वच्छ ठेवण्यासाठी आपण साबण, बॉडी वॉश आणि शॅम्पू वापरतो. पण एवढे करूनही शरीराचा एक भाग असा आहे ज्याकडे आपल्यापैकी अनेकजण शरीराची स्वच्छता करताना दुर्लक्ष करतात. या लेखाद्वारे जाणून घ्या शरीराचा असा कोणता भाग आहे जो रोज आंघोळ करूनही घाण राहतो याची रंजक माहिती (फोटो सौजन्य – iStock)
शरीराचा ‘हा’ भाग राहतो सर्वात घाण
आंघोळ करूनही बेंबी अर्थात नाभी राहते घाण
2012 मध्ये PLOS One मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, पोटातील नाभी किंवा नाभीसंबधीचा भाग आपल्या शरीराचा सर्वात घाणेरडा भाग मानला जातो. अभ्यासात आढळले की, नाभीमध्ये 2,368 प्रकारचे जीवाणू आहेत. त्यामुळे नाभी हा शरीराचा सर्वात घाणेरडा भाग मानला जातो. नाभीच्या भागात खूप घाम येतो, त्यामुळे या भागात बॅक्टेरिया जमा होतात आणि दुर्गंधीही येते. आपल्यापैकी बरेच जण रोज आंघोळ करतात पण आंघोळ करताना या भागाकडे दुर्लक्ष करतात. बरेच लोक याकडे लक्षही देत नाहीत, जे योग्य नाही. शास्त्रज्ञांच्या मते या भागातही स्वच्छता खूप महत्त्वाची आहे.
आंघोळ करताना सात चुका करू नका, नाहीतर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल
शरीराचे अवयव स्वच्छ ठेवणे गरजेचे
स्वच्छता राखणे महत्त्वाचे
शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार आणि व्यायाम पुरेसा आहे, असे बहुतेकांना वाटते. तथापि, हे केल्याने अवयव निरोगीदेखील राहतात. पण, शारीरिक आरोग्यासाठी स्वच्छताही खूप महत्त्वाची आहे. स्वच्छ न राहिल्यास अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज आंघोळ करणे आणि शरीराचे संपूर्ण अवयव स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे.
अवयव सुकवणे महत्त्वाचे
रोज आंघोळ केल्याने शरीर निरोगी आणि ताजेतवाने राहते आणि बॅक्टेरिया पसरत नाहीत, याशिवाय आंघोळीमुळे शरीराला खूप आराम मिळतो. तथापि, दररोज आंघोळ करणे पुरेसे नाही. आंघोळीनंतर तुमच्या शरीराचा कोणताही भाग ओला राहणार नाही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. शरीराचा कोणताही भाग ओला राहिला तर त्या भागात ओलावा निर्माण होऊ शकतो. आर्द्रतेमुळे बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. म्हणून, शरीर योग्यरित्या कोरडे करणे फार महत्वाचे आहे.
तुम्हीसुद्धा आंघोळ करताना लघवी करता?; जाणून घ्या त्याचे परिणाम
कशी करावी नाभी साफ
नाभी साफ करण्याची पद्धत
वॉशक्लॉथ वापरून नाभीच्या आजूबाजूचा आणि आतील भाग कोमट पाण्याने आणि थोड्या प्रमाणात साबणाने काळजीपूर्वक स्वच्छ करा. नाभीतून सर्व पाणी निघून गेले आहे याची खात्री करण्यासाठी ताजे, कोमट पाण्याने स्वच्छ धुवा आणि टॉवेलने वाळवा किंवा जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा मार्ग वापरायचा असेल, तर कापसाचा गोळा अल्कोहोलमध्ये बुडवा आणि पृष्ठभागावर हळूवारपणे दाबा. नाभी नीट स्वच्छ झाली का पाहा. एकदा स्वच्छ, पाण्यात बुडवलेल्या नवीन कापसाने पुसून टाका जेणेकरून तुमची त्वचा कोरडी होणार नाही.